road construction ( file photo )
road construction ( file photo )esakal

Dhule News : 63 कोटींतून 64 रस्त्यांचे रुपडे पालटणार; सुवर्णजयंती नगरोत्थानअंतर्गत मंजुरी

Published on

Dhule News : महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत धुळे शहरातील ८० फुटी रोडसह इतर विविध भागांतील ६४ रस्ते, गटारांच्या कामांसाठी राज्य शासनाने सुमारे ६३ कोटी रुपये मंजूर केले.

त्यामुळे येत्या काळात शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील ६४ रस्त्यांचे रुपडे पालटणार आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी राज्य शासनाकडे यासाठी विशेष पाठपुरावा केला.(Out of 63 crore 64 roads will be rehabilitated in dhule news)

नगरोत्थानअंतर्गत कामे

महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत धुळे शहरातील रस्तेविकास प्रकल्पास शासकीय मंजुरी मिळाली आहे. या रस्तेकामांसाठी राज्य शासनाने ६२ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली. या निधीसाठी खासदार डॉ. भामरे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्यांच्या कामांना निधी मान्यतेचे पत्र राज्याच्या नगरविकास विभागाने खासदार डॉ. भामरे यांना दिले आहे.

या कामांसाठी खासदार डॉ. भामरे, भारतीय जनता पक्षाचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार मोहन नवले, माजी महापौर प्रदीप कर्पे यांनीही मंत्रालयस्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. यात ४० कोटी रुपयांच्या निधीसाठी श्री. अंपळकर, नवले, तर २२ कोटींतील निधीच्या रस्त्यांसाठी श्री. अंपळकर, श्री. कर्पे यांनी पाठपुरावा केला, अशी माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

मागणीची दखल, पाठपुरावा

शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली होती. याबाबत शहरवासीयांकडून सातत्याने रस्त्यांच्या कामांबाबत मागणी होत होती. या मागण्यांची दखल घेत खासदार डॉ. भामरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यातून धुळे महापालिकेतर्फे शहरातील रस्तेविकास प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

प्रक्रियेअंती शासनाने रस्तेविकास प्रकल्पास मान्यता दिली. रस्ते प्रकल्प मंजूर केल्याबद्दल डॉ. भामरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले.

road construction ( file photo )
Dhule News : 3 राज्यांतील विजयाचा भाजपतर्फे धुळ्यात जल्लोष

एक कोटीवर खर्चाचे रस्ते

-८० फुटी रोड, स्टेशन रोडपासून कनोसा कॉन्व्हेंट स्कूलपर्यंत (एक कोटी ६७ लाख ८६ हजार ९३७)

-पवननगरअंतर्गत बंदिस्त गटार व रस्त्याचे काँक्रिटीकरण (एक कोटी २४ लाख ३२ हजार ३२९)

-जळगाव जनता कॉलनी, विठ्ठलनगरअंतर्गत बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरण (एक कोटी ६५ लाख ८४ हजार ५७५)

-१०० फुटी रस्ता चाळीसगाव रोड ते मालेगाव रोड तसेच रस्त्यालगतचे रस्ते व गटार (एक कोटी ६५ लाख ८४ हजार ५७५)

-चाळीसगाव रोडलगत भगवान अंपळकर यांच्या दुकानासमोर गटार करणे (एक कोटी ६५ लाख ६२ हजार ७१३)

-सप्तशृंगीनगर, अंबिकानगर, छोरियानगर, कोरकेनगर, शिंदेनगर भागात बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरण (एक कोटी ६५ लाख ८४ हजार ५७५)

road construction ( file photo )
Dhule News : बिलाडी येथील तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

-गोविंद अपार्टमेंट, सुगंधनगर, मिरजकरनगर, ८० गाळे, वल्लभनगर, विश्वकर्मानगर, स्नेहनगर भागात बंदिस्त गटार, रस्ता काँक्रिटीकरण (एक कोटी ६५ लाख ८४ हजार ५७५)

-नॅशनल हायवे व विश्वकर्मा मंदिर मुख्य रस्ता (एक कोटी ६७ लाख ८० हजार ६०६)

-आनंदनगर, इंद्रप्रस्थनगर व रामकृष्णनगरअंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (एक कोटी २४ लाख १६१)

-प्रभाग चारमधील जयहिंद कॉलनी, राजपूत कॉलनी, मयूर कॉलनी व गीतानगरमध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण (एक कोटी ६५ लाख ३० हजार ९६)

-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते ८० फुटी रोड ते नटराज टॉकीज, रामवदेवबाबानगरपर्यंत रस्ता डांबरीकरण (पाच कोटी सहा लाख ६७ हजार)

-अग्रसेन महाराज चौक ते लोकमान्य हॉस्पिटल ते तिरंगा चौक रस्ता डांबरीकरण (पाच कोटी ३४ लाख ७१ हजार ६२३)

-बाळापूर परिसर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (एक कोटी ६४ लाख ८६ हजार ५९२)

-प्रभाग दहामधील वरखेडी परिसरात अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (दोन कोटी ४६ लाख १९ हजार ४४७)

-सॉ मिल परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण (एक कोटी ६४ लाख ८० हजार ५५०)

road construction ( file photo )
Dhule News : सिंचन विहीर योजनेतून वगळलेल्या गावांनाही लाभ : आमदार कुणाल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com