पालखेडचे पाणी मिळणार फक्त मनमाड व येवल्यासाठीच.

पालखेडचे पाणी मिळणार फक्त मनमाड व येवल्यासाठीच.

येवला - अंदरसुल परिसरात पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या भागातील वितरीका ४५ ते ५२ च्या लाभक्षेत्रात येणारे बंधारे पालखेड कालव्याच्या आवर्तनातुन भरुन देण्याची माणगी होत आहे. मात्र पाऊस नसून, धरणात पुरेसे पाणी नसल्याने येवला व मनमाड वगळता कुणालाही पाणी न देण्याची भूमिका जिल्हाधिकार्यांनी घेतली आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी टंचाईग्रस्त भागातही पिण्यासाठी मिळावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे व अंदरसुच्या सरपंच विनीता सोनवणे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली. यावेळी पाणी सोडण्याबाबत लेखी निवेदन देऊन चर्चा केली. संपूर्ण येवला तालुक्यात अत्यल्प पर्जन्यानामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे सोनवणे यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आणुन दिले. तसेच पाणी सोडण्याची गरज असल्याचे तहसीलदारांचे पत्र देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले मात्र पाऊस न पडल्यास पुढे काय करणार असा सवाल करून पाणी देण्यास जिल्हाधिकार्यांनी असमर्थता दर्शवली.

सध्या पाऊस थांबला असल्याने पालखेड धरण समुहातील धरणे ओव्हरफ्लो झालेले नसून संपूर्ण पालखेड धरण समुहात फक्त ६५ टक्के पर्यंत पाणीसाठा आहे. त्यामुळे प्रशासनाने फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या मनमाडसह येवल्यातील पाणी योजनांना पाणी देण्याचे निर्णय घेतला असुन त्याकरीता पाणी सोडण्यात आले आहे. येथे येवला नगरपालिका व फक्त ३८ गाव पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तळ्यामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी यावेळी सोनवणे यांना सांगितले. सदर पाणी चालू असतांना जर यदाकदाचित पालखेड धरण समुहात पाऊस झाला तर हेच आवर्तन कायम करून इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देण्याचा निर्णय घेऊ असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगीतले.त्यामुळे सध्या चालु असलेल्या आवर्तनामधुन पाणी मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

“पाण्याअभावी शेतीची वाट लागली आहे.मात्र जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी तरी हालअपेष्ठा होऊ नये यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा पाहता पिण्याची गरज भागवणारे बंधारे भरून द्यायला हवे, यासाठी पाठपुरावा करत राहणार.”
मकरंद सोनवणे, संचालक, बाजार समिती, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com