मनमानमध्ये पांडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मनमाड - दिल्ली येथे समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून घटना जाळणाऱ्या पांडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देवून मनुस्मृतीचे दहन करत निषेध केला आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत फाशी देण्याची मागणी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

मनमाड - दिल्ली येथे समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून घटना जाळणाऱ्या पांडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देवून मनुस्मृतीचे दहन करत निषेध केला आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत फाशी देण्याची मागणी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

आज सकाळी रिपाइं भवन येथून रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनकर धिवर,  जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, शहराध्यक्ष दिलीप नरवडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला हातात निळे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले मनुवादी वृत्तीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली विविध मार्गावरून जात मोर्चा एकात्मता चौकात आल्यावर विविध वक्त्यांची भाषणे झाली यावेळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिल्ली येथे श्रीनिवास पांडे व त्याच्या साथीदार समाजकंटकांनी अगदी संसदे जवळ असलेल्या जंतरमंतर येथे  लोकशाहीच्या प्रक्रियेला विरोध करत भारतीय संविधानाची प्रत जाळली तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निंदा करण्याचा प्रकार केला लोकशाही, संविधान विरोधी घोषणाबाजी केली इतकेच नव्हे तर या समाजकंटकांनी आणि जाणीवपूर्वक या घटनेचे फोटो, व्हिडीओ तयार करून तो सोशलमीडियावर व्हायरल करण्यात येत आहे हा प्रकार अत्यंत निषेधार्थ असून लोकशाही मानणाऱ्या भारताला काळिमा फासणारा आहे हे देशद्रोही कृत्य वेळीच हाणून पाडले पाहिजे केंद्र सरकारने आणि दिल्ली सरकारने या प्रकारची दखल घेत संविधानाची प्रत जाळणारे, डॉ आंबेडकरांची निंदा करणारे आणि हे सर्व कृत्य फोटो, व्हिडीओद्वारे व्हायरलं करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत फाशी देण्याची मागणी केली यावेळी गळ्यात चप्पल घातलेल्या पांडेचा पुतळा जेसीबीला लटकवत फाशी देण्यात आली तर उपस्थित महिलांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन केले   यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पी आर निळे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे, रुपेश आहिरे, गुरू निकाळे, सुरेश शिंदे, महिला आघाडीच्या रुख्मिणीबाई आहिरे, अलका सोनवणे, मंगला सोनवणे, बबन वाघ, खरात बाई यावेळी भारिप, वंजारी सेवा संघ, मनमाड बचाव कृती समिती, काँग्रेस पार्टी, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आदी विविध पक्ष, संघटनातर्फे आंदोलनास पाठींबा देण्यात आला

Web Title: Pandey's iconic statue hanging