बागलाणमध्ये बिबट्यामुळे पुन्हा दहशत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

अंबासन (जि. नाशिक) - तळवाडे भामेर (जि. बागलाण) येथे पुन्हा बिबट्याची दहशत वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील धनंजय शंकर गायकवाड यांच्या गोठ्यातील सहा महिन्याचे वासरूला बिबट्याची फस्त केले असून या भागात नेमके किती बिबट्याचा वावर आहे. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

काटवन परिसरात मागील महिन्यात १५ जूनला पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंज-यात अलगद अटकल्याने परिसरातील दहशतीतूनच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्याचे वासरूला फस्त केल्याने नागरिक भितीच्या सावटाखाली आले आहेत. याच भागात मागिल काही महिन्यांपूर्वी येथील कोमल नामदेव नामदास या पाच वर्षीय मुलाला बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेऊन ठार केल्याची घटना घडली. पुन्हा गुरूवारी (ता.३१) रोजी भीमराव दौलत गायकवाड यांच्या मालकीच्या गोमदर पाड्यालगत असलेल्या शेतात मेंढपाळ गुलाब गणपत नामदास यांची मुलगी दुर्गा (उर्फ पुजा) गुलाब नामदास (वय साडेतीन वर्ष) झोपली असतांना बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी मागणी केली होती. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे या भागात लावले होते. त्यात पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंज-यात अटकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र पुन्हा याच बिबट्याची दहशत वाढल्याने परिसरात किती बिबट्याचा वावर आहे याबाबत नागरिकांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावेळी वनरक्षक एस.बी.मरशिवणे, वनमजूर एन.एल.देवरे यांनी पंचनामा केला. वनविभागाने बिबट्याच्या त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी उपसरपंच योगेश गायकवाड, हेमंत गायकवाड, योगेश भामरे यांनी केली आहे.   

Web Title: panic due to leopard