परिवर्तन'ने कुमार गंधर्वांच्या जागविल्या आठवणी!

भूषण श्रीखंडे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

जळगाव : "परिवर्तन जळगाव' निर्मित "अपूर्णांक' या नाटकाचा प्रयोग मराठी साहित्य अकादमीच्यावतीने नुकताच देवास येथे झाला. या प्रयोगाच्या निमित्ताने "परिवर्तन' परिवाराने जगप्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी यांनी परिवर्तन परिवाराचे स्वागत केले. 

जळगाव : "परिवर्तन जळगाव' निर्मित "अपूर्णांक' या नाटकाचा प्रयोग मराठी साहित्य अकादमीच्यावतीने नुकताच देवास येथे झाला. या प्रयोगाच्या निमित्ताने "परिवर्तन' परिवाराने जगप्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी यांनी परिवर्तन परिवाराचे स्वागत केले. 

या भेटीप्रसंगी मराठी साहित्य अकादमीच्या निदेशक पूर्णिमा हुंडीवाले व विजय भालेराव, परिवर्तन परिवाराचे शंभू पाटील, चिंतामण पाटील, मंजूषा भिडे, होरिलसिंग राजपूत, सोनाली पाटील, मोना निंबाळकर, प्रवीण पाटील, राहुल निंबाळकर उपस्थित होते. 
"परिवर्तन'चा जळगाव येथे कुमार गंधर्व संगीत महोत्सव जानेवारी महिन्यात होतो. या वर्षांपासून हा महोत्सव सुरू झाला आहे. कलापिनी कोमकल्ली यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांना जळगाव येथे येण्याची विनंती "परिवर्तन' परिवारातर्फे करण्यात आली. "मी नक्की येईल', असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. "कालजयी कुमार गंधर्व' या मराठी व हिंदी, इंग्रजी पुस्तकांचे संपादन कलापिनी कोमकल्ली व रेखा इनामदार यांनी केले आहे. ही पुस्तके देऊन परिवर्तनचे स्वागत करण्यात आले. 
चांमुडा माता मंदिर टेकडीच्या पायथ्याशी कुमारजी यांचे झाडांच्या सान्निध्यात असलेले सुंदर घर, तेथील शांतता, कुमारजी यांचा वावर असलेली वास्तू, कुमारजी यांचा तंबोरा व इतर वाद्य, त्यांची रियाजाची खोली हे सगळं भारावून टाकणारं होतं. यावेळी कलापिनी यांनी प्रेमाने सगळी माहिती दिल्याने एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती सगळ्यांना आल्याचे या परिवारातील सदस्यांनी सांगितले. 

सुमधूर संबंधांचा धागा 
कुमारजी यांची डॉ. राम आपटे, ना. धों. महानोर यांच्यासोबत असलेली मैत्री यामुळे जळगाव हे आम्हा कुटुंबीयांना परिचयाचे आहे आणि आता 
कुमारजी व जळगाव
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'parivartan' awakens memories of Kumar Gandharva!