बहादरपुर वानप्रस्थ आश्रमाला डॉ. सतिश पाटील यांची मदत 

संजय पाटील
Friday, 24 January 2020

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. सतीष पाटील यांनी आपल्या मातोश्री स्व. मनकर्णिकाबाई (आक्का) भास्करराव पाटील यांचे स्मरणार्थ एक लाखाची मदत केली आहे. 

पारोळा ः बहादरपूर (ता.पारोळा) येथील रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपुरला वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याच्या नवीन वर्षात संकल्प केला आहे. या आश्रम निर्मितीकामी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. सतीष पाटील यांनी आपल्या मातोश्री स्व. मनकर्णिकाबाई (आक्का) भास्करराव पाटील यांचे स्मरणार्थ एक लाखाची मदत केली आहे. 

बहादरपुरात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्थेने अनेकविध उपक्रम राबवुन गावाचे नाव उंचावलेले आहे. तालुक्‍यातील निराधार वयोवृद्ध जणांना आधार मिळावा.त्यांचे देखील जीवनमान उंचावे यासाठी वानप्रस्थ आश्रमाची निर्मिती साठी लोकांकडून मदत म्हणून चाळीस दिवसांची पदयात्रा निलिमा मिश्रा यांनी मौन धारण करुन काढली असुन आज ता,24 रोजी शहरात त्यांची पदयात्रा आली असता माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ आर्थिक सहयोग दिल्याने त्यांचे वानप्रस्थच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान तालुक्‍यातील 40 खेडेंची ही पदयात्रा असून जळगाव धुळे नंदुरबार 
या जिल्ह्यातील तालुक्‍यासह खेडे म्हणजेच खानदेशात पदयात्रा नीलिमा मिश्रा यांनी सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parola marathi news bhadrpur ashram help ncp do. satish patil