Nandurbar News : बसमधील पाणी गळतीने प्रवासी त्रस्त; प्रवाशांची गैरसोय

Navapur: Rain water falling on Navapur-Surat bus and standing passengers.
Navapur: Rain water falling on Navapur-Surat bus and standing passengers.esakal

Nandurbar News : राज्य परिवहन महामंडळाच्या नवापूर आगाराला कोणी नव्या, चांगल्या सुस्थितीतल्या बस देता का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास असे सांगत बसने प्रवास करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत प्रवासी बस मधून प्रवास करीत आहेत.

महिलांना पन्नास टक्के सूट मिळाल्याने महिलांची संख्या वाढली, बसचे उत्पन्न ही वाढले, मात्र बस प्रवासी घेऊन जाण्यासाठी सुस्थितीत नाहीत. बसच्या खिडक्यांच्या काही काचा गायब, काही काचांचे व खिडक्यांचे रबर पॅकिंगच नसल्याने प्रचंड कर्कश आवाजाने प्रवाशांना डोकेदुखी होते, पावसाळ्यात पाणी ही गळायला लागल्याने प्रवासी वैतागले आहे.

बस लांब पल्ल्याच्या असोत की ग्रामीणच्या फेऱ्या करणाऱ्या बस सर्वच सारख्या असल्याची स्थिती आहे.(Passengers suffering due to water leakage in bus Inconvenience of passengers There no space for passengers to sit Navapur Surat bus Nandurbar News)

प्रवाशांच्या सेवेसाठी असे बिरुद मिरविणारे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची नवापूर आगाराची नवापूर सूरत बस (एमएच १४ बीटी २११४) नवापूर बसस्थानकातून सकाळी साडेसातला नेहमीप्रमाणे निघाली.

नवापूरहून सुरत प्रवासादरम्यान बसच्या खिडक्यांचा कर्कश आवाज, काही खिडकीच्या काचा तुटलेल्या या स्थितीत असलेल्या बसने लांब पल्ल्याचा प्रवास प्रवासी नाइलाजाने करत होते, त्यात पावसाला सुरवात झाल्यानंतर बसमध्ये गळती सुरु झाली.

पाणी गळायला लागल्याने प्रवाशांना बसायला, उभे राहायला जागा नव्हती. बसल्या जागेवर पाणी गळत असल्याने सीट वरून उठून उभे राहिले तर त्या जागेवर ही पाणी गळत होते. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Navapur: Rain water falling on Navapur-Surat bus and standing passengers.
Nandurbar News : दोंडाईचा आगारातून आज पंढरपूरसाठी दरतासाला बस

बसची दुरुस्ती व्हावी

नवापूर आगार विभागाने नवीन बसची मागणी केली आहे, मात्र त्या कधी मिळतील, किती मिळतील, अपेक्षित संख्येत मिळतील का, आहेत त्या बसची दुरुस्ती का करत नाहीत, खिडक्यांना रबर पॅकिंग का लावत नाहीत, दरवाजे, बसचे पत्रे व्यवस्थित वेल्डिंग करून आवाज बंद करण्याकडे लक्ष का दिले जात नाही. असे एक नव्हे डझनभर प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. नवापूर आगारात सध्या साठ बसेस आहेत मात्र सुस्थितीत दोन-चार बसेस आहेत.

२०१७ पासून नवीन बसच नाही

मात्र याबाबत आगार प्रमुखांपासून दुरुस्ती विभाग नवापूर आगाराला नवीन व चांगल्या बसेसची मागणी करत आहेत. नवापूर आगारात २०१७ पासून एकही बस नवीन आलेली नाही. ज्या जुन्या बसे आहेत. त्याच रस्त्यावर फिरताना दिसत आहे. नवापूर-सुरत बस मध्ये बसलेल्या प्रवासी वर्गाने या बस संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. पुणे, नाशिक, शिर्डी, मालेगाव, नगर, सुरत, अहमदाबाद, बडोदा या लांब पल्ल्याच्या गाड्यांची अवस्था फारच बिकट आहे. बसच्या खडखड आवाजापासून कधी मुक्ती मिळेल असा प्रश्न प्रवासी विचारताना दिसत आहे.

थेट उड्डाणपुलावरून बस

सध्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने बहुतेक गावांना उड्डाणपूल तयार केले आहेत. त्या गावातून जाण्यासाठी सर्व्हीस रोड तयार केले आहेत. चालकांना सक्त सूचना असताना काही चालक संबंधित गावांच्या सर्व्हीस रोडने जाऊन प्रवाशांना न घेता सरळ उड्डाणपुलावरून बस नेतात, यात प्रवासी वेळेवर अपेक्षित गावी पोचू शकत नाहीत. सर्व्हीस रोडने बस न्याव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.

Navapur: Rain water falling on Navapur-Surat bus and standing passengers.
Nandurbar News : आषाढी एकादशी - बकरी ईद एकाच दिवशी; ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com