जातीवर ठरतेय रुग्णांची उपचार पद्धती

युनूस शेख
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नाशिक महापालिका रुग्णालयाची अजब तऱ्हा - रुग्ण, नातेवाइकांत संताप

जुने नाशिक - एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने जाती-पातीचे राजकरण न करण्याचे आदेश पारीत करण्यात आले असताना मात्र महापालिका रुग्णालयात जातीच्या आधारे रुग्णांची उपचार पद्धती ठरविली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकाराचा समाजातील सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांनी निषेध केला आहे.

शहरातील विविध भागांत महापालिकेचे १७ रुग्णालय व सुमारे तितकेच उपरुग्णालय आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची तपासणी होत असते. तपासणीपूर्वी रुग्ण किंवा नातेवाइकांना उपचारासाठी केस पेपर काढावा लागतो. परंतु केस पेपर काढताना बऱ्याच वेळा रुग्णांची जात विचारल्याचे प्रकार रुग्णालयामध्ये घडत आहेत. याबाबत विचारणा केली असता केस पेपरमध्ये माहिती द्यावी लागत असल्याचे सांगितले जाते. परंतु केस पेपरवर जातीचा उल्लेख कशासाठी असा प्रश्‍न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पडत आहे. एकाच प्रकारच्या उपचारासाठी विशेष एका जातीला विशेष व अन्य जातीना वेगळे उपचार दिले जातात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे आणि असे जर घडत असेल तर लाजीरवाणी बाब असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे जर असे होत नसेल तर मग केस पेपरवर जातीच्या रकान्याचा उल्लेख करून महापालिका प्रशासन का भेदभाव करत आहे, असाही सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे वैद्यकीय विभागाच्या मते, पेपरवर रकाना जरी असला, तरी त्यावर जात भरून घेतली जात नाही. त्यामुळे रकान्याचा उल्लेख कशामुळे आहे, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

रुग्ण तपासणी करताना जातीचा आधार घेतला जात नाही. त्यामुळे पेपरवर तशी जातीच्या रकान्याची आवश्‍यकता नाही. परंतु जातीनुसार रुग्णाचे व त्यांच्यातील आजाराचे वर्गीकरण करण्याच्या उद्देशाने बहुदा रकान्याचा उल्लेख असेल.
- डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिकारी

Web Title: patient treatment depend on caste