पेट्रोलपंपावरील कामगाराला मारहाण करून रोकड लंपास 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - कानळदा रोडवरील अत्तरदे पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या तरुणावर पाळत ठेवून मारहाण करीत खिशातून 3 हजार 600 रुपयांची लूट केल्याची घटना काल रात्री घडली. गुन्हा दाखल होऊन तालुका पोलिसांनी तीन पैकी दोघा भामट्यांनी अटक केली रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले. 

जळगाव-कानळदा रोडवरील अत्तरदे यांच्या पेट्रोलपंपावरील कामगार गणेश अरुण रायसिंग (वय 21) याला शुक्रवार (ता. 3) मारहाण करून तिघा भामट्यांनी त्याच्या खिशातील 3 हजार 600 रुपये लुटून नेले होते. जखमी रायसींगने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे,अत्तरदे यांच्या पेट्रोलपंपावर नेहमी प्रमाणे काम करीत असताना मारहाणीच्या तीन दिवसांपूर्वी मोटारसायकलस्वार तरुण पेट्रोल भरण्यासाठी आले असताना ते, बसण्याच्या टुलवर पाय ठेवून उभे होते. त्यांना नीट उभे राहण्याचे सांगितल्याने त्यांनी मारहाण करण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी रात्री भूक लागल्याने पंपा समोरील टपरीवर कुरकूरे घेण्यासाठी गेलो असता पूर्वीपासूनच दबा धरून बसलेल्या तीन तरुणांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केली. मारहाण करताना खिशातील रोख रक्कम खिसा फाडून बळजबरीने हिसकावून नेली. घडल्या प्रकाराने भेदरुन जाऊन मालकांना माहिती दिल्यावर रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात बुलेट मोटारसायकलवर आलेल्या तिघांविरुद्ध लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोघांना अटक 
निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या पथकातील उपनिरीक्षक बी. डी. पाटील, जितेंद्र पाटील यांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी करून संशयितांचे फोटो व शूटिंग मिळवले होते, मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आशिष दशरथ बाविस्कर (वय 30) अक्षय भिकन निकम (वय 28) दोन्ही राहणार इंद्रप्रस्थनगर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटकेतील दोघांचा साथीदार दीपक ऊर्फ पल्हा आधार सोनवणे (रा. गेंदालाल मिल) हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. 

Web Title: Petrol pump worker beat