
बी फार्मसी करणाऱ्या २० वर्षीय तरुणानं मोबाईल हॅक झाल्याच्या भीतीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. शिरपूर तालुक्यातल्या ताजपुरी इथल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीनं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असं गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.