धुळे- अभिन्यासधारक, विकसकाने संबंधित वसाहतीत आवश्यक त्या भौतिक सुविधा न केल्यास संबंधिताकडील गहाण भूखंड विक्री करून तेथे भौतिक सुविधा केल्या जाणार आहेत. महापालिका आयुक्तांनी यासंबंधाने नुकतेच जाहीर प्रकटनातून याबाबत संबंधितांना नोंद घेण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत यापुढे नवीन वसाहती निर्माण होताना तेथे रस्ते, गटारी आदी भौतिक सुविधा निर्माण होतील. परिणामी, नंतर तेथील रहिवाशांना या सुविधांअभावी झगडावे लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.