भांडणाचे विचारले कारण अन.. छतीवर झाडली गोळी 

gun
gun

पारोळा ः पिंपळकोठा (ता. पारोळा) येथे भांडणाचे कारण विचारल्याने तरुणावर गावठी बंदुकाने गोळी झाडल्याची खळबजणक घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झाली. घडलेल्या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले असून जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

प्लेग महाराजांची यात्रेच्या निमित्ताने गावात तमाशा मंडळ आले होते. तमाशा पाहण्यासाठी चनेश्वर नथ्थु पाटील (वय 30) हे गेले होते. यावेळी यशवंत सुभाष पाटील, जगदीश पुंडा पाटील हे देखील तमाशा पाहण्यासाठी आले असतांना त्यांचे अपसात भांडण सुरू होते. भांडण सुरू असतांना चनेश्वर पाटील यांनी भांडण करु नका असे सांगितल्याचा राग जगदीश पाटील यांना आल्यावर त्यांनी कंबरेचा गावठी कट्टा (बंदुक) काढून चनेश्वर यांच्या छातीवर ठेवुन गोळी मारली. या घटनेबाबत पारोऴा पोलिसात चनेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन आरोपी जगदीश पाटील व चार इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे. 

नातेवाईंकांनी तातडीने रुग्णालयात नेले 
गोळीबारच्या घटनेत चनेश्वर पाटील हे गंभीर जखमी जाखल्याने तत्काळ नातेवाईंकांनी घटना स्थळ गाठत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. तर घडलेल्या घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com