अपघातात मृत्यू झालेल्या उर्वशीच्या नावाने शाळेत वटवृक्षाचे रोपण

रोशन भामरे  
गुरुवार, 28 जून 2018

मुंजवाड येथील जनता विद्यालयात ६ वी मध्ये शिकणारी आपली मैत्रीण व विद्यार्थिनी उर्वशी अचानक सर्वाना सोडून गेल्यामुळे शाळेत तिच्या आठवणीतून शिक्षक व मित्र-मैत्रिणीचे डोळे मात्र भरून येत आहेत. तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उर्वशी नावाच्या एका वृक्षाचे रोपण केले तसेच विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे आणि शाळेच्या फलकावर उर्वशीचे बोलके चित्र रेखाटले आहे.

तळवाडे दिगर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरवाडे वणी शिवारात शनिवारी (ता.२३) रोजी झालेल्या भीषण अपघातात आठ निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता. या अपघातात मुंजवाड (ता.बागलाण) येथील उर्वशी मोरे या चिमुकल्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंजवाड येथील जनता विद्यालयात ६ वी मध्ये शिकणारी आपली मैत्रीण व विद्यार्थिनी उर्वशी अचानक सर्वाना सोडून गेल्यामुळे शाळेत तिच्या आठवणीतून शिक्षक व मित्र-मैत्रिणीचे डोळे मात्र भरून येत आहेत. तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उर्वशी नावाच्या एका वृक्षाचे रोपण केले तसेच विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे आणि शाळेच्या फलकावर उर्वशीचे बोलके चित्र रेखाटले आहे.

उर्वशी म्हणजे अप्सरा, एक सुंदर मुलगी अगदी या स्वर्ग लोकातील उर्वशी अप्सरेप्रमाणे जनता विदयालय मुंजवाड येथे इ. ६ वीच्या वर्गात शिकणारी नावाप्रमाणेच हुशार, नम्र, गोंडस, सुशील मैत्रिणीशी मिळून मिसळून वागणारी शिक्षक व वडीलधाऱ्यांचा तितकाच सन्मान करणारी हे संस्काराचे बाळकडू कुटुंबांतुन,गावातून व शाळेतून तिला मिळाले होते. मुंजवाड गावात सायकल गर्ल म्हणून गावात तिची ओळख होती.

मुंजवाड गावातील एका सामन्य कुटुंबात जन्मलेली होती. वडील विनायक यांचा वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय आहे. घरात लाडकी असलेली उर्वशी नातेवाईकंच्या लग्नाला गेली असताना शिरवाडे वाणी शिवरात झालेल्या अपघातात तिच्या दुर्देवी मृत्यू झाला.ही बातमी समजल्यावर मुंजवाड गावावर व विद्यालयात हळहळ व्यक्त केली गेली. उर्वशीच्या मृत्यू नंतर आज (बुधवारी) पाचव्याच दिवशी त्याच अपघातात जखमी झालेल्या उर्वशीच्या आईचे देखील निधन झाले.

या सर्वांच्या लाडक्या उर्वशीचे स्मरण राहावे म्हणून तिच्या विद्यालयात तीच्या नावाने एक वट वृक्ष लावून त्याला उर्वशी नाव देण्यात आले व कलाशिक्षक दिंगबर आहिरे यांची तिचे बोलके चित्र विद्यालयातील फलकावर रेखाटले आहे. त्यावेळी मुख्याध्यापक एम.एन.शेवाळे विद्यालयातील सर्वशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Planting of the tree in the name of Urvashi, who died in the accident