
धुळे : प्लॅस्टिक बंद म्हणजे बंद; महापालिकेचा आदेश
धुळे : एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या (Plastic) वस्तू, पिशव्यांची साठवणूक, वाहतूक व वितरण, व्रिकी आणि वापरावर शुक्रवार (ता. १)पासून पूर्णपणे बंदी (Ban) घालण्यात आली आहे. असे असले तरी शासनाच्या एका जीआरवरून (GR) व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. (Plastic ban dhule Municipal corporation order Dhule News)
एकीकडे महापालिका म्हणते प्लॅस्टिक बंद म्हणजे बंद, तर दुसरीकडे जीआरमधून मात्र वेगळा अर्थ निघतो. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. याप्रकरणी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ महापालिका प्रशासनाला भेटले. दुसऱ्या दिवशी बैठक घेऊ, असे महापालिकेने सांगितले. बैठक मात्र झालीच नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिक पिवशी वापरावर बंदी घातली आहे. या निर्णयाचे व्यापारी स्वागतच करीत आहेत. कापड दुकानांमध्ये सध्या सिंगल यूज बॅग्स वापरले जात नाही, नॉन ओवन बॅग्ज वापरल्या जातात.
हेही वाचा: हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार
नॉन ओवन बॅग्ज सिंगल युज प्लॅस्टिक नाहीत, अशा बँगचा सर्वच ठिकाणी वापर होतो. त्यासाठी शासनाची परवानगी आहे. ६० जीएसएमपेक्षा जास्त असलेल्या नॉन ओवन बॅग्ज आणि ७५ जीएसएम पेक्षा जास्तीच्या प्लॅस्टिक बॅगला परवानगी असल्याचे राजपत्रात नमूद आहे. असे असताना या बॅग्ज चालणार नाहीत, असे म्हणत महापालिकेकडून कारवाई होते. एकीकडे शासनाचा जीआर सांगतो, की नॉन ओवन बॅग्ज चालतील, दुसरीकडे महापालिका मात्र नॉन ओवन बॅग्जचा मुद्दा समजून न घेता कारवाईचा बडगा उगारते. या स्थितीत व्यापाऱ्यांनी करायचे तरी काय, अशी हतबलता व्यक्त केली जात आहे. परवा व्यापारी याप्रकरणी महापालिका प्रशासनाला निवेदन द्यायला गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी चारला बैठक असेल, आम्ही फोन करू, असे सांगितले. मात्र, महापालिकेकडून कुठलाही संपर्क साधला गेला नाही, असे व्यापारी रुणवाल यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Jalgaon : यावल अभयारण्यातील अतिक्रमण काढले
Web Title: Plastic Ban Dhule Municipal Corporation Order Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..