"प्लॅस्टिक वेस्ट'मधून इंधनासह अनेक पर्याय 

"प्लॅस्टिक वेस्ट'मधून इंधनासह अनेक पर्याय 

जळगाव : प्लॅस्टिक ही एकमेव वस्तू आहे, जी पाचशेपेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या रुपरंगात पुनर्निमिती करून वापरता येते. पर्यावरणाला घातक असल्याचा नुसताच कांगावा केला जातो. स्थानिक प्रशासनाने नियमितपणे स्वच्छता आणि वेस्ट प्लॅस्टिक संकलन केल्यास त्यातून इंधन निर्मिती होते. जळगाव शहरात अशी इंधन निर्मिती करून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे मोठे कार्य उद्योजकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, शासनाची प्लॅस्टिक बंदीची घोषणा निव्वळ पोकळ असून, यातून फारसे काही साध्य होणार नाही, असा मत प्लॅस्टिक निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 
प्लॅस्टिक उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेतील स्थिती यांची एकत्रितपणे सर्वांना माहिती मिळावी, यासाठी मार्गदर्शक ठरणारे "प्लास्टिव्हिजन इंडिया- 2020' हे जागतिक दर्जाचे प्रदर्शन ऑल इंडिया प्लॅस्टिक्‍स मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. आशिया खंडासह जवळपास संपूर्ण जगातील उद्योजक आपआपल्या नवसंशोधनांसह या प्रदर्शनात सहभागी होत असून, 16 ते 20 जानेवारी दरम्यान उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन "प्लास्टिव्हिजन'चे कमिटीचे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी पत्रकार परिषदेतून केले. एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते सांगत होते. यावेळी उपाध्यक्ष किशोर संपत, जळगावातील प्लास्टिव्हिजन कार्यक्रम नियोजन अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, लघु उद्योगभारतीचे उपाध्यक्ष रवी फालक, समन्वयक विनोद बियाणी, समीर साने, संतोष इंगळे यांची उपस्थिती होती. 

जागतिक दर्जाचे प्रदर्शन 
"यूएफआय' या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या सर्वोच्च समितीसह भारत सरकारनेही "प्लास्टिव्हिजन इंडिया 2020' ला मान्यता दिली आहे. तसेच एनएसआयसी व एमएसएमई विभागातर्फे लघु आणि मध्यम नवउद्योजकांना आर्थिक अनुदानही देण्यात येणार आहे. 1 लाख चौरस मीटर क्षेत्रातील या अतिभव्य प्रदर्शनाची तीन महिन्यांपूर्वीच सर्व स्टॉल्स बुक असून, पंधराशेहूनन अधिक प्रदर्शकांचे मॉडेल येथे उपल्ब्ध होणार आहेत. 25 देशातील उत्पादकांनी आपला सहभाग निश्‍चित केल्याने येथे नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री जागतिक दर्जाचे नवनवे संशोधन सादर होणार आहेत. यात कृषी, सौरऊर्जा, ऑटोमेशन, डाय आणि मोल्ड, वेस्ट मॅनेजमेंट (टाकावूतून टिकावू) आणि थ्रीडी प्रिटिंग्‌ या क्षेत्रातील अनुभवी उद्योजक त्यांचे उत्पादन तसेच सेवा या संदर्भात मार्गदर्शन आणि सादरीकरणही करतील. त्याचप्रमाणे या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था आणि उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने देशभर पन्नासहून अधिक रोड शोद्वारे सुमारे अडीच लाखांहून अधिक व्यावसायिकांना याकडे आकर्षित करण्याचा मानस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com