PM Modi: 'इथले आदिवासी हे आफ्रिकन आहेत का?', पंतप्रधान मोदींचा नंदुरबारमध्ये सवाल; काँग्रेसवर केली टीका

PM Modi: देशासह राज्यभरात निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आहेत. सध्या ते नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.
PM Modi Rally
PM Modi RallyEsakal

देशासह राज्यभरात निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आहेत. सध्या ते नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले वंचितांचा(एससी, एसटी, ओबीसी) जो आधिकार आहे त्याचे मोदी चौकीदार आहेत. त्याचबरोबर त्यांनी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे.

सभेत बोलताना ते म्हणाले, 'आम्ही माता शबरीची पुजा करणारे लोक आहोत. मात्र, काँग्रेसने आदीवासी समाजाला कधी सन्मान मिळू दिला नाही. आदीवासी क्रांतीकारकांनी स्वांतत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिले. मात्र, स्वांतत्र्य मिळवण्याचे श्रेय काँग्रेस फक्त एका परिवाराला देते. हे भाजप आहे जे देशभरात आदीवासी स्वांतत्र्य सैन्यांवर संग्रहालय बनवत आहेत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजेल आदीवासींनी देशासाठी किती मोठे बलिदान दिले आहे.

PM Modi Rally
'काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...'; पंतप्रधान मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर!

भाजपने आदीवासीच्या मुलीला राष्ट्रपती बनवले, असं पहिल्यांदा झालं. पंरतु तुमच्या लक्षात असुद्या ते कोण लोक होते ज्यांनी आदीवासींची मुलगी द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती निवडणुकीतून हरवण्यासाठी रात्रंदिवस एक केले होते ते काँग्रेस होते. द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती बनू नयेत यासाठी काँग्रेसने अनेक प्रयत्न केले होते. काँग्रेसने असं का केलं त्याचं कारण दोन दिवसांपुर्वी समोर आलं आहे.

PM Modi Rally
Derek O'brien Interview : एकनाथ शिंदे व अजित पवारांचा लवकरच राजकीय अस्त ; तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांचे धक्कादायक भाकीत

काँग्रेसचे जे शेहजादे आहेत त्यांचे एक गुरू अमेरीकेत राहतात, त्यांनी भारतातील लोकांवर रंगाभेदावर टिपण्णी केली आहे. रंगाच्या आधारावर भेद केला आहे. ज्यांचा रंग भगवान कृष्णासारखा आहे त्यांना काँग्रेस आफ्रिकन मानते. त्यामुळे द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती व्हावे हे त्यांना मंजूर नव्हते. इथे जे भगवान कृष्णाच्या रंगाचे आहेत ते सर्व आफ्रिकन आहेत का? असा सवाल करत हा अपमान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com