महाजनादेश यात्रेस शुभेच्छा देत मोदी नाशिककडे, वरूणराजाची हजेरी

PM Narendra Modi will present at Mahajanadesh yatra at Nahik
PM Narendra Modi will present at Mahajanadesh yatra at Nahik

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत, या अनोख्या उपक्रमांसाठी जात असल्याचे ट्विट केले. या आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले.

जनतेच्या प्रश्नासंदर्भात आपण केलेल्या कामांची माहिती देण्याचा आणि संवाद साधण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान अशी प्रगती करत असून महाराष्ट्राला त्यामुळे स्थैर्यता लाभण्यास मदत होत आहे. त्यांच्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आहे. मी सव्वा वाजता या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधेल, आपण जरूर पहा आणि ऐका असेही नमूद केले आहे.

संपूर्ण राज्यभर फिरून आलेल्या महाजनादेश यात्रेचे काल नाशिककरांनी उत्सर्फुत स्वागत केले. नाशिकमधील विविध भागात फिरून सायंकाळी सातला पंचवटी परिसरात या यात्रेचा समारोप झाला. या यात्रेच्या निमित्ताने नाशिक भगवेमय झाले आहे. बॅनर्स,पोस्टरच्या माध्यमातून भाजपने वातावरणनिर्मिती केली असून आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचे रणशिंग आजच्या पंतप्रधानांच्या सभेतून फुंकले जाणार आहे. 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
या यात्रेत मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधतांना राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांचा आर्शीवाद घेतला, आता पुढील काळात विजय रथयात्रा काढण्यात येणार असून विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवूनच याचा समारोप होईल,असे नमूद करत सविस्तर संवाद आज पंतप्रधानांच्या उपस्थित साधणार असल्याचे नमूद केले.

नाशिकमधील एक नव्हे अनेक प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारे प्रलंबित आहे. त्यात नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला पाच वर्षापासून गती मिळेना, शासकीय मुद्रणालयांचे विस्तारीकरण ठप्प आहे.डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा ही हवेत राहिली आहे. मनमाड इंदुर रेल्वेमार्गाचे काम संथपण आहे. नाशिकला नोटा छपाई कारखान्याची घोषणा हवेत आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये समावेश कधी हे देखील एक प्रश्नच आहे. याशिवाय केंद्राच्या उडान योजनेच्या विमानोड्डांना तारीख पे तारीख मिळत आहे हे सर्व केंद्रस्तरावरील प्रश्न आहे, तर मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यापासून पाहिजे त्या प्रमाणात ठोस कामे झालेल नाही. त्यामुळे या दत्तक पालकांकडून नाशिककरांना सिंहस्थ ३२५ एकर जमिनीचे संपादन पाच वर्षापासून ठप्प आहे. कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा विषय रखडलेला आहे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळालेला नाही. एकलहरे ६६० मेगावॉटचा वीज प्रकल्प ७ वर्षापासून ठप्प आहे, नाशिकला चित्रनगरीच्या घोषणेबाबत पाठपुरावा संथगतीने आहे. यासारखे प्रश्न आहे. त्यामुळे आजच्या सभेत हे दोघेही काय घोषणा करतात आणि नाशिककरांच्या पदरात काय पडते. त्याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com