लाच म्हणून कॅरमबोर्ड मागणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक : उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहात दाखल केलेल्या मुलाच्या जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी तक्रारादाराकडे कॅरमबोर्डची मागणी करून ते स्वीकारणाऱ्या अधीक्षिका नलिनी काशिनाथ पाटील, लिपीक प्रशांत उत्तम देसले यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उंटवाडी रोडवर बालनिरीक्षणगृह असून याठिकाणी तक्रारदाराच्या मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशान्वये दाखल करण्यात आले होते. त्या मुलास बाल न्यायमंडळाकडून जामीन मिळावा यासाठी बालनिरीक्षण गृहाच्या अधीक्षकांकडून सकारात्मक अहवाल आणि जामीन मिळाल्यानंतर सोडविण्यासाठी सहकार्याची अपेक्षा तक्रारदाराने व्यक्त केली होती.

त्यावेळी बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षिका नलिनी पाटील आणि लिपिक प्रशांत देसले यांनी तक्रारदारांकडे कॅरमबोर्डची मागणी केली होती. क्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालनिरीक्षण गृहाच्या परिसरात सापळा रचला होता. लाचखोर नलिनी पाटील व प्रशांत देसले यांनी लाचेच्या स्वरुपात कॅरमबोर्ड स्वीकारल्यानंतर पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरीच्या घटनेमुळे बालनिरीक्षणगृह पुन्हा चर्चेत आले आहे.

Web Title: police arrested to corrupt officers