Dhule Mahamarathon : मॅरेथॉन ‘हिट’ होण्यासाठी धुळेकर सज्ज; स्पर्धकांना रविवारची प्रतीक्षा!

Dhule Marathon News
Dhule Marathon Newsesakal

धुळे : येथील पोलिस कवायत मैदानावरून रविवारी (ता. ५) बिनचूकपणे सकाळी सहाला सुरू होणाऱ्या जिल्हास्तरीय महामॅरेथॉन (Mahamarathon) स्पर्धेबाबत उत्सुकता शिगेला पोचली असून, तयारी पूर्णत्वाकडे आहे. ‘फिट धुळे...हिट धुळे’ या घोषवाक्यानुसार मॅरेथॉन स्पर्धा ‘सुपर हिट’ होण्यासाठी धुळेकरांसह राज्यातून ठिकठिकाणाहून येणारे स्पर्धक सज्ज झाले आहेत. (curiosity about district level Mahamarathon competition has reached its peak preparations are nearing completion dhule news)

त्यांना रविवार पहाटेची प्रतीक्षा आहे. स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होत धुळेकरांसह अन्य स्पर्धकांनी बक्षिसांची लयलूट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, जिल्हा परिषदेच्या सीईओ बुवनेश्‍वरी एस., महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव यांनी केले.

पोलिस प्रशासनातर्फे पुढाकार घेणारे जिल्हा अधीक्षक संजय बारकुंड, माध्यम प्रायोजक असलेल्या ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे आणि शासकीय यंत्रणेसह दानशूरांच्या पाठबळाने जिल्ह्यात प्रथमच मेगा मॅराथॉन स्पर्धा होत आहे. तिला तुफान प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीची संख्या २० हजारांहून अधिक झाली आहे. त्यानुसार आयोजक पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

स्टेज, स्टॉलची जोरदार उभारणी

पोलिस ग्राउंडवर स्टेज, व्हीआयपी कक्ष, इतर स्टॉल, बचतगटांचे स्टॉल उभारणीसाठी वेगात काम सुरू आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेसह अन्य कामे, मैदानाच्या साफसफाईसह विविध कामे वेगाने सुरू आहेत. तसेच वीस सेल्फी पॉइंटचे कामही सुरू आहे.

स्पर्धेसोबत वैयक्तिक व कौटुंबिक स्पर्धकांना हा इव्हेंट आनंद मेळाही वाटावा म्हणून पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, आयोजन समितीचे सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. बारकुंड यांनी केले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

स्टेज उभारणी
स्टेज उभारणीesakal
Dhule Marathon News
World record: शेफ विष्णू मनोहर नोंदविणार जागतिक विक्रम! नाशिककरांना खाऊ घालणार मोफत 4 हजार किलो पौष्टिक भगर
टी-शर्टचे वाटप
टी-शर्टचे वाटपesakal

टी-शर्टचे आज वाटप आणि ‘लिंक’पोलिस ग्राउंडवर असलेल्या २७ स्टॉलवर शनिवारी (ता. ४) सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत स्पर्धक क्रमांकासह मोफत टी-शर्टचे वाटप होणार आहे. शनिवारीच वाटपाचे काम पूर्ण होईल. पोलिस बंदोबस्तात होणाऱ्या या वाटपात नोंदणी केलेल्या स्पर्धकांना मापानुसार टी-शर्टचे वाटप होईल.

स्पर्धकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शिस्तीत टी-शर्ट घ्यावेत, असे आवाहन आहे. यात स्पर्धक क्रमांक अर्थात BIB नंबरसाठी संकेतस्थळावरील https://tinyurl.com/४mjb४५dv या लिंकवर संपर्क साधावा. या लिंकद्वारे स्पर्धक एसएमएस, व्हॉट्सॲप व ईमेलद्वारे BIB नंबर पाहू शकतात. त्या नंबरची माहिती घेऊन त्यांनी हजर राहावे.

तसेच स्पर्धेबाबत नियम, स्पर्धेच्या मार्गासाठी https://tinyurl.com/२unktzft या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. बिबसाठी स्पर्धकांना एसएमएस करण्यात आले आहेत. मॅरेथॉनमधील स्पर्धकांसाठी रिपोर्टिंग टाइम पहाटे पाच असा आहे. त्यांनी या वेळेत पोलिस ग्राउंडवर उपस्थित राहावे.

Dhule Marathon News
SAKAL Exclusive | भारत व्‍हावे Diabetes Care Capital! : पद्मश्री डॉ. शशांक जोशी

स्पर्धकांसाठी असेल झुम्बा डान्स

पोलिस ग्राउंडवर सकाळी साडेपाचपासून स्पर्धकांसाठी वॉर्म-अपचे सेशन, तसेच झुम्बा डान्स असेल. त्यामुळे स्पर्धक, विशेषतः व्यायामाला पसंती देणारे व फॅमिली रनमधील कुटुंबांना झुम्बा डॉन्सचा आनंद घेता येईल. यासाठी हर्षल मराठे व तेजस गवळी यांची टीम ही जबाबदारी सांभाळेल. त्यासाठी पोलिस ग्राउंडवर प्रभावी साउंड सिस्टिम, स्टेज सज्ज होत आहे.

वैद्यकीय सुविधा व एनर्जी स्पॉट

ेमॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांची आयोजकांकडून काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी पोलिस ग्राउंडवर महिला व पुरुष स्पर्धकांसाठी स्वतंत्रपणे रिकव्हरी रूम तयार केली जात आहे. तेथे फिजिओथेअरपिस्ट तत्पर असतील. तसेच या शेजारील पेन्डॉलमध्ये महिला व पुरुष डॉक्टरांचे पथक सज्ज असेल. ते उपचार देतील.

तसेच पोलिस ग्राउंडवरून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या मार्गातील छत्रपती शिवाजी पुतळा, पाचकंदील चौक, बॉम्बे लॉज, गांधी पुतळा, अजमेरा फार्मसी, दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूर गावालगत दोन ठिकाणी एनर्जी स्पॉट असतील. तेथे स्पर्धकांना विविध सेवाभावी संस्था, व्यावसायिक एनर्जी ड्रिंक, पाण्याची सुविधा उपलब्ध ठेवतील.

या मार्गावरील नागरिक, सेवाभावी संस्थांनी मदत केल्यास स्वागत असेल. त्यांनीही स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आहे. तसेच स्पर्धेच्या मार्गावरील क्रॉसिंग रस्त्यांलगत ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय पथके, स्वयंसेवक मदतीसाठी उपस्थित असतील. त्यामुळे स्पर्धकांना कुठलीही अडचण संभवणार नाही. स्पर्धा मार्गावर महिला व पुरुष पोलिसांचा पहारा असेल. तेही मदतीसाठी तत्पर असतील. स्पर्धेचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने चिंतेचे कारण नसेल.

Dhule Marathon News
Nandurbar News : विविध दाखल्यांसाठी लाभार्थ्यांची गैरसोय
चिअर-अपसाठी विद्यार्थी सज्ज
चिअर-अपसाठी विद्यार्थी सज्जesakal

चिअर-अपसाठी विद्यार्थी सज्ज

स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी स्पर्धकांना चिअर-अप करण्यासाठी शहरासह परिसरातील ३० ते ३५ शाळांच्या विद्यार्थ्यांचा समूह उपस्थित असेल. लेझीम, बॅण्ड, ढोल-ताशांसह स्पर्धकांचा जोश वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओंसह माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पुढाकाराने नियोजन झाले आहे.

त्याबाबत त्यांनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्पर्धा मार्गाच्या परिसरातील शाळा, शासकीय संस्था, महाविद्यालयांना प्रवेशद्वार खुले ठेवण्याची सूचना असून, तेथे नागरिक वाहने पार्क करू शकतील व प्रसाधनगृहाचा वापर करू शकतील. -

ग्राउंडवर मोफत मेडल, रिफ्रेशमेंट

महिला व पुरुष स्पर्धक पोलिस ग्राउंडवर परतल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे २७ स्टॉलवर मोफत रिफ्रेशमेंटचा बॉक्स व मेडल प्रदान केले जाईल. तसेच ई- प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्था, विविध संस्थांचे स्वयंसेवक, महिला व पोलिस बांधव सज्ज असतील. त्यांना स्पर्धकांनी सहकार्य करावे.

ग्राउंडवर मोफत मेडल
ग्राउंडवर मोफत मेडलesakal
Dhule Marathon News
Youth in Addiction : पिंपळगावची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात! पालकांना सतावतेय चिंता

शिस्तीत रांगेत प्रत्येकाला या बाबी वाटप होतील याची काळजी आयोजकांनी घेतली आहे. इंदूर येथून आकर्षक मेडल, विजेत्यांना मेडलसह करंडक मागविण्यात आले आहेत. स्पर्धकांच्या स्वागतासाठी शहरासह स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी असतील.

महापालिकेसह विविध सेवाभावी संस्थांतर्फे कर्मचारी, स्वयंसेवक तत्पर असतील. स्पर्धेचा मार्ग पीडब्ल्यूडी व मनपातर्फे सज्ज केला जात आहे. आयोजकांसह पोलिस प्रशासनाने स्पर्धेसाठी आवश्‍यक ती तयारी पूर्ण केली आहे. स्पर्धकांनी ही स्पर्धा अधिकाधिक संख्येच्या सहभागातून यशस्वी करावी, असे आवाहन आहे.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी यांचे पाठबळ

जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेस माध्यम प्रायोजक ‘सकाळ’ माध्यम समूह, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडसह मोफत टी-शर्टसाठी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर धुळे एसव्हीकेएम कॅम्पस, पद्‌मश्री बिल्डर्स, मोफत मेडलसाठी बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान, आटोमोबाईल असोसिएशन, पारितोषिकांसाठी एस. कांतिलाल ज्वेलर्स,

Dhule Marathon News
Nandurbar News : बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

तसेच स्पर्धा यशस्वितेसाठी ब्लॅक ओॲसिस टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स, औद्योगिक क्षेत्रातील नामांकित संजय सोया, डिसान ॲग्रो, महाराष्ट्र एक्स्ट्रॅक्शन ऑइल, ओमश्री ॲग्रो ग्रुप, वंडर सिमेंट, दी हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक, क्रेडाई, स्वर्ण स्पर्श, चंद्रकांत केले मेडिकल ॲन्ड रिसर्च फाउंडेशन संचलित काशीनाथ सखाराम केले डायलेसिस सेंटर,

हॉटेल चंद्रदीप रेजन्सी, अल्ट्राटेक, आर. एम. केमिकल, विक्रम राठोड, निकम फार्मसी, नाशिककर ज्वेलर्स, व्यापारी महासंघ, रोटरी क्लब, गोल्डन लिफ, झंकार गार्डन, हॉटेल रसराज, ऋतुराज रेजन्सी, जळगाव जनता सहकारी बँक आदींसह अनेक दानशूरांनी पाठबळ दिले आहे.

"कुटुंबासह धुळेकरांनी, विविध स्पर्धकांनी धुळे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून पोलिस प्रशासन, ‘सकाळ’ माध्यम समूह व इतर सहभागी यंत्रणा, दानशूरांनी केलेल्या प्रयत्नांना यशस्वी करावे. मॅरोथॉन सुपर हिट होण्यासाठी धुळेकरांना शुभेच्छा." -आदेश बांदेकर, मुंबई अध्यक्ष, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास

"धुळेकरांनी तंदुरुस्तीसाठी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा. अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा. ‘फिट धुळे...हिट धुळे’ हे घोषवाक्य अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन सार्थ ठरवावे, असे आवाहन आहे." -कविता राऊत, नाशिक, धावपटू, सावरपाडा एक्स्प्रेस

Dhule Marathon News
Satyajeet Tambe : तांबे कुटुंबीयांचा करिश्‍मा निर्णायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com