वणीचे पोलिस हवालदार कारच्या धडकेने ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

वणी - वणी-नाशिक रस्त्यावर कृष्णगाव शिवारात कारने दुचाकीला धडक दिल्याने दिंडोरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी जाणारे वणी पोलिस ठाण्याचे हवालदार ठार झाले. मंगळवारी (ता. 22) सकाळी वणी पोलिस ठाण्याचे हवालदार बाळू माधव मोरे (वय 52, रा. पिंपळगाव बसवंत) दुचाकीवरून दिंडोरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी जात असताना, कृष्णगाव शिवारात कारने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात मोरे यांच्या डोक्‍यास, हातपायांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक व पोलिसांनी लागलीच वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: police constable balu more death in accident