एटीएम फोडून पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक : सातपूर येथील एटीएम फोडून पळ काढणाऱ्या पाच संशयितांपैकी दोन संशयितांना मंगळवारी (ता.24) पहाटे पंचवटीतील हिरावाडी रोडवरील क्षीरसागर कॉलनीत सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले.  

 

नाशिक : सातपूर येथील एटीएम फोडून पळ काढणाऱ्या पाच संशयितांपैकी दोन संशयितांना मंगळवारी (ता.24) पहाटे पंचवटीतील हिरावाडी रोडवरील क्षीरसागर कॉलनीत सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले.  पाच संशीयतानी एका बँकेचे एटीएम फोडले व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. विधातेनगर परिसरात गाडीला पोलीसांची गाडी आडवी लावून दोघा संशयितांना पकडले तर इतर संशयित फरार झाले. दोघा संशयित आरोपींना सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून यापूर्वी शहरात झालेल्या एटीएम पुढच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संशयित आरोपींकडून पोलिसांनी चारचाकी गाडी जप्त केली असून जीप चोरीची आहे का याचा तपास सुरू आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police cought thieves in panchvati

टॅग्स