अन् खाकीतली माणुसकी पाझरली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

एम.आय.डी. सी. पोलीसांनी वैद्यकीय तपासणीकामी जिल्हा सामान्य रुग्णालय , येथे रवाना केले. तपासणीनंतर सर्वांची राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे.

जळगाव :  कोरोनाचा प्रादृर्भाव वाढू नये यासाठी सरकारने संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे, बस सहीत सर्व प्रवासी वाहने बंद आहेत. मोठ्या शहरांमध्ये मोल मजुरीसाठी स्थलांतरीतांनी गावाकडे धाव घेतली आहे. यातायात बंद असल्याने सुरतहुन थेट पायी विदर्भाच्या दिशेने निघालेल्या नागरिकांसाठी खाकितली माणुसकी पाझरली आहे. जागा मार्गे प्रवास करत असलेल्या यवतमाळच्या चौदा जणांची एमआयडीसी पोलिसांनी निवासासह जेवणाची व्यवस्था केली आहे . 

आज (शनिवार, ता.28) रोजी सकाळी 11 वाजता पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सुरत येथुन काही नागरिक पायी विदर्भाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. इच्छादेवी चौकातून हा जत्था अंजिठा चौकात पोहचला असतांना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , आनंदसिंग पाटील , रामकृष्ण पाटील , इम्रान अली सैय्यद , मुद्दस्सर काझी , सचिन पाटील , मुकेश पाटील अशा कर्मचाऱ्यांच्या पथकाने या सार्वांना थांबवुन चौकशी केली. 

मास्क सह सॅनिटायझरही वाटप 

पायी निघालेल्यांमध्ये रणजीत परशुराम राठोड , निलेश विसावर राठोड , निखील प्रकाश चव्हाण , किशोर रामदास जाधव , निलेश जंगु पवार , राजु सुरेश राठोड , राहुल बबन मंडळ , साईदुल बारा गुलाम बारा , पोभीसेन सुनिल सेन , अविनाश पुंडलिक चव्हाण , प्रविण पुंडलिक पवार , सचिन शांताराम पवार , उमेश प्रेम राठोड , रबी मोहन राठोड सर्व (रा. ता . दरवा , जि , यवतमाळ) सर्वांची विचारपुस केली. सर्वांना जेवणासह निवाऱ्याची आवश्‍यकता असल्याने यदेवा तुझा मी सोनार सेवाभावी संघटना व पातोंडकर ज्वेलर्सचे संचालक किरण शेठ पातोंडकर यांचेशी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. दोघांच्या सहकार्याने संबधित नागरिकांना मास्क व सेनीटायझर चे वाटप करण्यात आले. 

जेवणासह राहण्याची केली सोय 

यानंतर सर्व नागरिकांची शाम चव्हाण , सादिक शेख मेहबुब , इम्रान खान अकबर खान , निजाम मुलतानी या सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर घुगे पाटील ट्रान्सपोर्टचे गजेंद्र झिपरु पाटील यांनी वाहन उपलब्ध करुन देऊन संबधितांना एम.आय.डी. सी. पोलीसांनी वैद्यकीय तपासणीकामी जिल्हा सामान्य रुग्णालय , येथे रवाना केले. तपासणीनंतर सर्वांची राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. सहकार्याबद्दल यवतमाळच्या नागरिकांनी पोलिसांसह सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. 

कोरोनाच्या यंत्र साहित्य खरेदीसाठी आमदारांना ५० लाखांचा निधी; शासनाचा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Helped Citizens Who Were Travelling From Surat To Yavatmal