पोलिसांच्या घरांची समस्या सोडविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

नाशिक :  नाशिक परिक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत नव्याने पोलिस ठाणी निर्माण झाली असली, तरी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या रहिवासाचा प्रश्‍न गंभीर आहे. याच संदर्भात आज पोलिस गृहनिर्माण मंडळाचे अप्पर पोलिस महासंचालक व व्यवस्थापक के. एल. बिष्णोई यांनी आज आढावा बैठक घेतली आणि प्राधान्यक्रमाने आवश्‍यक प्रस्तावांवर चर्चा झाली. विशेषतः नगर पोलिस हेडक्वॉर्टर, शिर्डी आणि सिन्नर पोलिस वसाहतींसंदर्भात चर्चा झाली.

पोलिस गृहनिर्माण मंडळाचे अप्पर पोलिस महासंचालक व व्यवस्थापक के. एल. बिष्णोई यांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त एस. जगन्नाथन, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह नगर, धुळे, जळगाव व नंदुरबारच्या पोलिस अधीक्षकांबरोबर चर्चा केली. नाशिक परिक्षेत्रातून पोलिस गृहनिर्माण विभागाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जिल्ह्यांमध्ये नव्याने पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. वाढत्या कर्मचाऱ्यांच्या घरांची उपलब्धता नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या वेळी बिष्णोई यांनी आवश्‍यक असलेल्या ठिकाणच्या इमारतीच्या बांधकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन दिले.

आवश्‍यकतेनुसार प्राधान्य 

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आडगाव पोलिस ठाणे व मुख्यालयातील नवीन घरांचा मुद्दा उपस्थित केला. आडगाव, गंगापूर व उपनगर पोलिस ठाण्यांची जागा भाडेतत्त्वावर आहे. यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिस दलाने नवीन पोलिस ठाण्यांच्या इमारतींचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठीचा प्रस्ताव या वेळी सादर करण्यात आला असून, आवश्‍यकतेनुसार या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी, नगर, सिन्नरला प्राधान्य
नगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या पाहता, त्या तुलनेत घरे अत्यंत कमी आहेत. नगर हेडक्वॉर्टरमधील स्थितीही अशीच आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी घरांची कमतरता आहे. त्यामुळे येथील घरांची समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.

Web Title: Police housing problem solution