Dhule News : अवैध मिनी गॅसपंपावर छापा; पोलिसांकडून रिक्षासह 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal Mini Gap Pumps raided in Malegaon Road area with seized items
Illegal Mini Gap Pumps raided in Malegaon Road area with seized items esakal

धुळे : शहरातील मालेगाव रोडवरील शारदा पंजाब हॉटेलमागील गुजर कम्पाउंडजवळ एका घरात सुरू असलेल्या अवैध मिनी गॅसपंपावर पोलिसांनी छापा (Raid) घातला.

या कारवाईत दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर रिक्षासह ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (police raid illegal mini gas pump and confiscated goods worth 93 thousand along with rickshaw dhule crime news)

सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्यासह पथकाने शारदा पंजाब हॉटेलमागील गुजर कम्पाउंडच्या बोळीत, बागूल इंजिनिअरिंग दुकानाजवळील मोहंमद सादीक शहाबुद्दीन शहा (वय २०) याच्या घरात छापा टाकला.

त्या वेळी तो घरगुती वापरावयाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीररीत्या फैजल शेख फिरोज (वय २३, रा. दोन हजार वस्ती, पूर्व हुडको, धुळे) याच्या ऑटो रिक्षात (एमएच २, डीके ८९८८) विद्युत मोटार, नोझलच्या सहाय्याने गॅस भरताना मिळून आले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Illegal Mini Gap Pumps raided in Malegaon Road area with seized items
Dhule News : दिघाव्यात हल्लेखोर बिबट्याची दहशत कायम!

पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ९३ हजार ८०० रुपये किमतीचे दहा गॅस सिलिंडर, विद्युत मोटार, इलेक्ट्रिक वजनकाटा, ऑटोरिक्षा व रोख ८०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, हवालदार कबिरोद्दीन शेख, रमेश उघडे, प्रशांत पाटील, चंद्रकांत जोशी, मंगा शेमले, कर्नल बापू चौरे, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Illegal Mini Gap Pumps raided in Malegaon Road area with seized items
Success Story : देवळ्याच्या लेकीची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी; राज्यात OBC संवर्गात मुलींमध्ये आली दुसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com