Dhule News : दिघाव्यात हल्लेखोर बिबट्याची दहशत कायम!

leopard attack
leopard attackesakal

म्हसदी (जि. धुळे) : दिघावे (ता. साक्री) येथील कामद शिवारात मंगळवारी (ता. २८) सायंकाळी शेतात गव्हास अंतिम टप्प्यातील पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने (Leopard) पाठीमागून हल्ला चढवत गंभीर जखमी केले. (farmer who was watering wheat in field was attacked by leopard from behind seriously injured dhule news)

धाडसी शेतकऱ्याने ‘दोन हात’‌ करत स्वतःची बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. एरवी पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या नरभक्षक झाल्याने आता रात्रीच काय दिवसादेखील शेतात जाऊ नये का, असा प्रश्न दिघाव्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

वन्यपशूंचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून, शेतकरी, शेतमजुरांच्या ‘सुरक्षेचा’ प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेहमीप्रमाणे बंदोबस्तासाठी वन विभागाने कानावर हात ठेवले आहेत. दिघावे रस्त्यालगत असलेल्या कामद शिवारात शेतकरी भय्या तथा विवेक अरुण अहिरराव (वय ३८) गव्हाच्या पिकात पाणी भरत होते.

दबा धरलेल्या बिबट्याने पाठीमागून झडप मारत हल्ला चढवत श्री. अहिरराव यांच्या मानेचा लचका तोडत पाठीवर, छातीवर पंजा मारत गंभीर जखमी केले. धाडसी शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत बिबट्याला पिटाळून लावत स्वतःची सुटका करून घेतली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

leopard attack
Nandurbar News : अज्ञात माथेफिरूने कापली केळीची झाडे; पिंप्री येथील शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

हल्लेखोर बिबट्या नसून पट्टेरी वाघच!

भरदिवसा नरभक्षक बिबट्या वा वाघसदृश वन्यप्राण्याने हल्ला केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. हल्लेखोर बिबट्या नसून पट्टेरी वाघच असल्याचा दावा जखमी श्री. अहिरराव यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून रात्रीच काय दिवसादेखील बिबट्या हमखास पाहायला मिळत असल्याची माहिती बुधवारी सकाळी दिघावे येथील अनेक शेतकऱ्यांनी दिली.

या संदर्भात शेतकऱ्यांनी वन विभागास माहिती दिल्यावर पट्टेरी वाघच काय पण तो नक्की बिबट्याच होता का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शेतकऱ्यांकडे केली जाते. भरदिवसा नरभक्षक बिबट्या शेतकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे वन विभाग कधी गांभीर्याने घेईल अशा खोचक प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

‌‌व‌न विभागाचे कानावर हात

जखमी शेतकऱ्यास मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमी शेतकऱ्याच्या चौकशीसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणे आवश्यक असताना अजूनदेखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी शेतकऱ्याची साधी विचारपूसदेखील केली नसल्याची माहिती कल्याण अहिरराव, नितीन अहिरराव, उमेश पवार, अभय अहिरराव, अरुण अहिरराव, योगेश अहिरराव यांनी दिली.

leopard attack
TET Exam : टेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना किचकट प्रश्नांनी फोडला घाम! 200 गुणांसाठी 120 मिनिटांचा अवधी अपुरा

एरवी शेतशिवारातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या आता माणसाची शिकार करण्याचे धाडस करत आहे. वन विभाग शेतकऱ्याचा बळी जाण्याची प्रतीक्षा तर करत नसेल ना, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

अनेकांच्या दृष्टीस पडणारा बिबट्या शेतकऱ्यावर हल्ला करत असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. हल्लेखोर बिबट्याच्या पावलांचे ठसे बुधवारी सकाळी शेतकऱ्यांना आढळून आले. पिंजरा‌ लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी व‌ ग्रामस्थांनी केली आहे.

"गेल्या काही दिवसांपासून दिघावे शिवारात बिबट्याच्या जोडीकडून धुमाकूळ घातला जात आहे. याविषयी वन विभागास अनेक वेळा माहितीही दिली जाते. पण घटनास्थळी अगदी पाहुण्यासारखी भेट देण्याची औपचारिक प्रक्रिया वनकर्मचाऱ्यांची असते. अशा वेळी बिबट्यास जेरबंद करणे हाच एकमेव पर्याय आहे." -नितीन अहिरराव, दिघावे (ता. साक्री)

leopard attack
Song Shooting : ‘चल चल जाऊ बाजाराला’ गाण्याचे जोगमोडीत चित्रिकरण; स्थानिक कलाकारांचा सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com