Nandurbar News : चक्क प्रदूषण ओळखणारे यंत्र..! खानदेशातील प्राध्यापकांनी मिळविले पेटंट

pollution detector
pollution detectoresakal

Nandurbar News : हवेतील प्रदूषणाची पातळी ओळखून हवेत प्रदूषण करणारे कोणते वायू किती प्रमाणात आहेत व त्या जागेवरील हवा श्वास घेण्यायोग्य आहे अथवा नाही, त्यामुळे त्या ठिकाणी आपण राहायचे अथवा नाही असे सांगणारे यंत्र विकसित झाले तर! होय, हवेतील प्रदूषणाची पातळी व प्रदूषण करणारे घटक सांगणाऱ्या यंत्राच्या प्रतिकृतीला भारतीय पातळीवर पेटंट मिळाले आहे.

हे यंत्र बनविले आहे, तळोद्यातील तसेच खानदेशातील प्राध्यापकांनी.(pollution detector made by Professors from Khandesh nandurbar news)

या प्राध्यापकांना त्या यंत्राच्या प्रतिकृतीला पेटंट मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे या प्राध्यापकांचे कौतुकासह अभिनंदन होत आहे. हवेचे प्रदूषण सध्याच्या काळात मोठी समस्या बनले आहे. हिवाळ्यात तर ही समस्या रौद्र रूप धारण करत असते.

अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावल्याच्या घटना नियमित घडत असतात. त्यात श्वास घेणेदेखील जिकिरीचे जात असते. दुसरीकडे शहरांमध्ये व गावपातळीवरदेखील अनेक कार्यक्रम बंद खोलीत अथवा हॉल वजा जागेत होत असतात. तेथेदेखील दाटीवाटीने नागरिक जमा झाल्यानंतर प्रदूषणाचा त्रास होत असतो.

या सर्व बाबी लक्षात घेऊन खानदेशातील अमळनेर येथील प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक मंडळाचा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. घनश्याम जगताप, अमळनेर येथील प्रा. डॉ. पी. एस. पाटील, चोपडा महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम व तळोद्यातील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक नीलेश गायकवाड यांच्या चमूने शहरांमधील वाढती प्रदूषणाची समस्या व त्यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याचे घातक परिणाम यावर महत्त्वपूर्ण उत्तर म्हणून बंद खोलीतील अथवा नियंत्रित वातावरणातील हवा प्रदूषणाची पातळी ओळखणाऱ्या यंत्राच्या प्रतिकृतीचे भारतीय पातळीवरील पेटंट घेण्यात यश मिळविले आहे.

pollution detector
Nandurbar News : शहरात 31 पर्यंत रुग्णांची मोफत तपासणी; छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा निर्णय

समाजकार्य महाविद्यालयात कार्य करत असताना समाजाप्रति व पर्यावरणाप्रति जागरूक राहून या चमूने विशेष प्रयत्न करून हे यंत्र विकसित करण्याचा मानस ठेवला आहे. त्यात त्यांना भारतीय पातळीवरील पेटंट मिळाल्याने भविष्यात वातावरणातील प्रदूषणाची पातळी व प्रदूषणाचे घटक यांची ओळख होऊन त्यावर उपाययोजना करता येणार असल्याने या प्राध्यापकांचे कौतुक करण्यात येत आहे.

''समाजकार्य विभागात असल्याने प्रदूषणाच्या समस्यांवर नेहमी चर्चा होते. त्यात सामाजिक व पर्यावरणीय जाणिवेतून प्रदूषणाची ओळख करणाऱ्या यंत्राबद्दल आम्ही चर्चा केली. त्यातून या यंत्राची निर्मिती झाली आहे. त्यात आता पेटंट मिळाले असल्याने यातील संशोधनाला गती देता येणार आहे.'' -प्रा. नीलेश गायकवाड, समाजकार्य महाविद्यालय, तळोदा

pollution detector
Nandurbar News : महिला, विद्यार्थ्यांसह वंचित घटकांनी मतदार नोंदणी करावी; 9 डिसेंबर अंतिम मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com