भूमिगत गटार योजनेसाठी मुख्यमंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

येवला - शहरातील भूमिगत गटार योजनेचा फेर प्रस्ताव पालिकेकडून व्यवस्थितरित्या बनवून घेऊन त्याला मंजुरीसाठी चालना देऊन मार्गी लावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर्विकास सचिवांना केल्या तसेच या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

येवला - शहरातील भूमिगत गटार योजनेचा फेर प्रस्ताव पालिकेकडून व्यवस्थितरित्या बनवून घेऊन त्याला मंजुरीसाठी चालना देऊन मार्गी लावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर्विकास सचिवांना केल्या तसेच या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

नागपूर अधिवेशनादरम्यान मंगळवारी येथील आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे तसेच नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या कक्षात भेट घेऊन भूमिगत गटार योजनेला व शहराला रस्ता विकास अनुदान मिळवून देण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी दराडे व पटणी यांनी या योजनेच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट करून काम सुरू होऊनही नंतर योजना बंद पडली आहे. त्यामुळे फेरप्रस्ताव मंजूर करून योजनेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.सुमारे ५२ कोटीच्या या योजनेचे सुमारे २० टक्के काम पुर्ण झाले असून पुढे काम बंद पडले ते सुरूच झालेले नस्ल्याची माहिती देण्यात आली.

या योजनेची माहिती घेत फडणवीस यांनी यावर तत्काळ नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना योजना मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.यावेळी म्हैसकर यांनी क्षीरसागर व पटनी यांना प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सखोल माहिती दिली.मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याशीदेखील दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी प्रस्ताव सादर करण्याविषयी मार्गदर्शन केले.मंत्रालयीन स्तरावरून सहकार्याची भूमिका असल्याने नगरपालिकेने विकासकामांसाठी पाठपुरावा करावा अशी सूचना आमदार दराडे यांनी केली.

“शासन स्तरावरून विविध विकास योजनांचा लाभ शहराला मिळविणे गरजेचे आहे.त्यासाठीच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन विविध विकास योजनांचा लाभ देण्याची विनंती केली व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. निधीसाठी यापुढे सदैव पाठपुरावा करत राहू.
-सुरज पटणी,उपनगराध्यक्ष,येवला

Web Title: Positive response to CM for underground drainage system