येवल्यात खड्ड्यांचा बॅन्डबाजा लावून वाढदिवस साजरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

"शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून नववसाहतीत तर पक्के रस्तेच नाहीत.यामुळे आम्ही पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.खड्डेभाऊंनी अनेक नागरिकांना दुखापत केलेली आहे, त्यामध्ये मणक्याचा त्रास असो मानेचा त्रास असा किंवा मोटारसायकल खाली पडलेले असे अनेक विविध कार्य या खड्ड्याभाऊमुळे झालेले आहे म्हणून आम्ही वाढदिवस साजरा केला."
- धिरजसिंह परदेशी, शिवसैनिक

येवला : शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याला जबाबदार आहे रस्त्याचे निकृष्ट बांधकाम यामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे शहर शिवसेना व शहरातील नागरीकांनी शहरातील  रस्त्यातील खड्ड्याचा वाढदिवस बँन्डबाजा लावीत खड्ड्याला फेटा बांधून केक कापून व लहान मुलांना चॉकलेट वाटुन मोठ्या जल्लोषात साजरा केला.  

येवल्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक वर्षापासून वारंवार मागण्या होऊनही त्याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.रस्त्याची साधी डागडुजी पण झालेली नाही. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास तर होतोच पण पादचार्‍यांचीही अवस्था काहीशी अशीच झाली आहे. शहरात मणययाचे आजार नव्याने निर्माण होत आहे.  

खड्डे तात्काळ बुजविणे बाबत  शहर शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदनाद्वारे कळविण्यातही आले होते व तसे न झाल्यास खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला होता.परंतु सुस्त नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने शिवसेनेने अखेर शहरातील महाराणा प्रताप चौक, गंगादरवाजा, थिएटर रोड, जुनी न.पा. रोड, मौलाना आझाद रोड आदी ठिकाणी असलेल्या खड्ड्यांना फेटा बांधुन, त्या ठिकाणी ढोल ताशाचा गजरात केक कापण्यात येऊन वाढदिवस साजरा करत  निषेध व्यक्त केला.    

याप्रसंगी येवला शहर शिवसेना संघटक धिरज परदेशी, अशोक मोहारे, श्रीकांत खंदारे, संजय सोमासे, प्रमोद तक्ते, शेरु मोमीन, शाकीर शेख, हाफिज अन्सारी, बंटी परदेशी, अतुल घटे, पप्पु भुसे, आत्मेश विखे, संजय आचारी, नितीन जाधव, संजय शिंदे, पवन संत, विशाल भावसार, गणेश वडनेरे, हकीम पटेल, दिपक काथवटे, बापु शिंदे, आदीत्य नाईक, प्रल्हाद कवाडे, सलीम अन्सारी, आदम मोमीन आदींसह शहरातील नागरीक उपस्थित होते.  

"शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून नववसाहतीत तर पक्के रस्तेच नाहीत.यामुळे आम्ही पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.खड्डेभाऊंनी अनेक नागरिकांना दुखापत केलेली आहे, त्यामध्ये मणक्याचा त्रास असो मानेचा त्रास असा किंवा मोटारसायकल खाली पडलेले असे अनेक विविध कार्य या खड्ड्याभाऊमुळे झालेले आहे म्हणून आम्ही वाढदिवस साजरा केला."
- धिरजसिंह परदेशी, शिवसैनिक

Web Title: potholes in Yeola