भुजबळांच्या सुटकेसाठी समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आकसापोटी अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे. ही कारवाई थांबवून त्यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज भुजबळ समर्थकांनी मूक मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, दिल्ली, बिहार, हरियाना, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यांमधील दहा लाखांहून अधिक भुजबळ समर्थक ओबीसीच्या झेंड्याखाली एक झाले होते. 

छगन भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केल्यानंतर ते अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु, जामीन मिळत नसल्याने तपास यंत्रणांवर दबाव आणून सरकार सुडाची कारवाई करीत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. यामुळे सरकारच्या विरोधात मागील महिन्यात सर्व भुजबळ समर्थकांनी नाशिक येथे मूक मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. तपोवनात सकाळी आठपासूनच देशभरातून आलेले मोर्चेकरी मोठ्या संख्येने जमले असल्यामुळे तेथील सर्व परिसर जणू पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता. मोर्चाची नियोजित वेळ दुपारी एकची असताना सव्वाबाराच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने पाऊणलाच मोर्चास सुरवात झाली. या मोर्चासाठी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: power presentation for chagan bhujbal