
Dhule Prakash Ambedkar : समाजाच्या उन्नतीसाठी आदिवासी समाज सत्ताधारी बनला पाहिजे. त्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागेल. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा दबावगट निर्माण होईल. (Prakash Ambedkar Tribal Elgar Mahasabha on 26 oct dhule news)
त्यासाठी वंचित आघाडीचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २६) दुपारी तीनला शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर आदिवासी एल्गार महासभा होईल, अशी माहिती एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जाधव म्हणाले, की जिल्ह्यात आदिवासी- भिल समाजाची संख्या मोठी आहे. हा समाज आंबेडकरी चळवळीकडे वळला पाहिजे. ओबीसी, दलितांपेक्षा जास्त हक्क महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला दिले आहेत.
आमचे प्रशासन असावे, जल- जमिनीवर आमचा हक्क असावा यासाठी आदिवासी क्रांतिकारक लढले. आम्हाला न मागता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे.
जो आदिवासी समाज आज भरकटला आहे, तो खासदार आंबेडकर यांच्यासोबत राहिला तर समाजाची उन्नती होईल. त्यांच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लढत आहे. संतोष जाधव, रविकांत वाघ, शंकर खरात आदी उपस्थित होते.
कल्याण समिती गप्प का?
आदिवासी कल्याण समितीत आदिवासी आमदार सदस्य असावेत. जे आहेत ते जनतेच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आदिवासींचे कल्याण झालेले नाही, असा आरोपही जाधव यांनी केला. महासभेला खासदार आंबेडकर यांच्यासह महिला नेत्या अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, एकलव्य आघाडीचे अनिलराव जाधव, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, किसनराव चव्हाण आदी मार्गदर्शन करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.