NMMS Scholarship : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Scholarship
Scholarshipesakal

NMMS Scholarship : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएसएस) आणि अपंग विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती योजना संचालनालयाने दिली.(Pre Matric Scholarship Application is Extension till 31 December dhule news )

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आल्याने आता संकेतस्थळावर नोंदणी करून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल.

केंद्र शासनाने दिलेली अंतिम तारीख विचारात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाइन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची असेल, असेही स्पष्ट केले आहे.

Scholarship
NMMS Scholarship: या गावचे विद्यार्थी मिळवतायेत तब्बल पावणेदोन कोटींची शिष्यवृत्ती; यशाचा पॅटर्न चर्चेत!

अनुदानित शाळेतील नववी-दहावीच्या ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. नियमानुसार सक्षम अधिकाऱ्‍याचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

एकाच पालकांच्या दोनपेक्षा अधिक पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील, असे सूचनेत नमूद केले आहे.

Scholarship
NMMS Scholarship : एनएमएमएस योजनेपासून ३९८ विद्यार्थी राहणार वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com