NMMS Scholarship: या गावचे विद्यार्थी मिळवतायेत तब्बल पावणेदोन कोटींची शिष्यवृत्ती; यशाचा पॅटर्न चर्चेत!

New English School and Junior College
New English School and Junior College esakal

Nashik News : सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. (63 students of school qualified for scholarship in NMMS Scholarship Examination sinnar nashik news)

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे तब्बल 63 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर मराठा व कुणबी संवर्गातील छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेअंतर्गत 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

सारथी अंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या दहा क्रमांकांपैकी पाच विद्यार्थी याच विद्यालयाचे असून प्राची घुगे ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तन्मयराजे जाधव हा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने तर वैभव कांगणे हा जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कृष्णा घुगे व ऋतुजा उगले यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

New English School and Junior College
Success Story : कमी वयात शोधला यशाचा ‘राज’मार्ग! गॉगलची क्रेझ ओळखत व्यवसायात 19व्या वर्षी भरारी

एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर चव्हाणके, कावेरी लांडगे, पृथ्वी शहाणे, श्रद्धा वाणी, वेदांत उगले, अथर्व वाणी, सार्थक चव्हाण, ओमकार सानप, प्रवीण बोऱ्हाडे, यश जाधव, कृष्णा उगले, सार्थक शिंदे, साहिल उगले, श्वेता वाणी, गौरव सातपुते, ऋतिक उगले, सार्थक उगले, सात्विक उगले, ओम आहेर, भूषण उगले, नयन घुगे, लक्षदीप गांगुर्डे, सिद्धेश पानसरे, धनंजय देशमुख, साहिल पानसरे, गौरव एरंडे, सिद्धार्थ घुले, यश कुरणे, सुवर्णा उगले, वेदांत सानप, सारा भालेराव, दीक्षा आहेर, समीक्षा सांगळे, वैष्णवी उगले

संकेत सानप, निशा पोमनर, तेजस्विनी बिडाईत, ईश्वरी जाधव, वैष्णवी शिंदे, साक्षी भोर, साधना उगले, सायली ढगे, ओम राजगुरू, शितल उगले, समीक्षा गरकळ, वैष्णवी कातकाडे, संस्कृती सानप, वैष्णवी देशमुख, साक्षी उगले, अनुष्का जंजाळ, अस्मिता उगले, कल्याणी उगले, स्वाती गायकवाड, वैष्णवी पाटील, समीर फड, संचिता कांगणे, आदित्य उगले, धनश्री कुऱ्हाडे हयांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत प्रति वर्ष 12 हजार रुपये प्रमाणे चार वर्षात 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्वांना एकूण शिष्यवृत्ती 30 लाख 24 हजार रुपये मिळणार आहे.

New English School and Junior College
Success Stories : झेडपी शाळेत शिकलेल्या तरुणाची भरारी, अमेरिकेत अधिकारी

या विद्यार्थ्यांना या परीक्षा विभाग प्रमुख संदीप लेंडे, सचिन मोरे, नवनाथ उगले, कृष्णा राठोड, संजय सोनवणे, निलेश एखंडे, धनराज ठाकरे, सलीम शेख, सुनीता आव्हाड, मोनिका पानसरे, मेघाली परदेशी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्ह्यातील 1123 शाळांमधून 11500 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 511 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून त्यापैकी 63 विद्यार्थी हे बारागाव पिंपरी विद्यालयाचे आहेत.

सन 2012 ते 2023 पर्यंत एनएमएमएस व सारथी योजनेअंतर्गत विद्यालयातील 366 विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना 1 कोटी 72 लाख 60 हजार शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. या यशाने एनएमएमएस परीक्षेतील यश व बारागाव पिंपरी विद्यालय हे समीकरण बनले असून विद्यालयाचा हा यशाचा पॅटर्न सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

New English School and Junior College
Success Story : वस्तीशाळेत शिकलेल्या गौरवची बँकिंग परीक्षेत गरुड भरारी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com