Janhavi More
sakal
जळगाव: छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर दुभाजकावर धडकलेल्या कारने पेट घेतल्याने कारमधील गर्भवती महिलेचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी (ता. १०) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेत पाच महिन्यांच्या गरोदर मातेचा कारमध्ये जळून अक्षरशः कोळसा झाला.