डाळिंबाचे भाव गडगडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करून उत्पादित केलेल्या लालचुटूक डाळिंबाचे भाव गडगडले आहेत. भगवा वाणाला 17 वर्षांमध्ये पहिल्यांदा नीचांकी भाव मिळाला आहे. पन्नास रुपयांवरून 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो अशी भावात घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत राज्यात 3 लाख टन डाळिंब शिल्लक असून घसरलेल्या बाजारभावाचा विचार करता शेतकऱ्यांना 750 कोटींचा दणका बसला आहे. 

संशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी भगवा वाण उपलब्ध होऊन पंधरा वर्षे झालीत. तत्पूर्वी दोन वर्षे शेतकऱ्यांनी याची लागवड केली होती. राज्यात यंदा भगवा वाणाचे 15 लाख टन इतके उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 3 ते 4 लाख टनांनी अधिक आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी नव्याने लागवड झालेल्या बागांमधील डाळिंब आता बाजारात येण्यास सुरवात झाल्याने आवक वाढण्यास मदत झाली आहे. सद्यःस्थितीत टरबूज, द्राक्षे, कलिंगड, आंबा अशी फळे बाजारात असताना उन्हामुळे डाळिंबाच्या सालीवर डाग आल्याने त्यास फारशी मागणी राहिलेली नाही. त्याचवेळी दिल्लीतही महाराष्ट्रातील डाळिंबाला विशेष पसंती मिळत नाही. हे मुख्य कारण भगवा वाणाचे भाव कोसळण्यामागे असल्याची माहिती डाळिंब महासंघाचे नेते प्रभाकर चांदणे यांनी दिली. 

Web Title: The prices of pomegranate collapsed