प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे आचारसंहितेनंतरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

जळगाव - जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत दुरुस्ती, रंगकाम, ब्लॉक करणे, कर्मचारी निवासस्थान, विद्युतीकरण या कामांसाठी यापूर्वीच 3 कोटी 92 लाख 48 हजार 641 रुपयांना मंजुरी देण्यात आली असून, आचारसंहितेनंतरच निविदा प्रक्रियेप्रमाणे कामास सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र यांच्या बांधकाम व दुरुस्तीसह कुटुंबकल्याण, साथरोग, शालेय आरोग्य, माता- बालसंगोपन या विषयांचा आढावा घेण्यात आला. सभेला प्रवीण पाटील, संदीप पाटील, कोकिळा पाटील आदी सदस्य उपस्थित होते. एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका असणे आवश्‍यक असून, सध्या पाच ते सात हजार लोकसंख्या असलेले क्षेत्र एका आशा स्वयंसेविकेला सांभाळावे लागते. यामुळे कामावर परिणाम होत असल्याचे सदस्य प्रवीण पाटील यांनी सभेत सांगितले.

पोषण आहाराचा आढावा
शालेय समितीच्या सभेत पोषण आहार तसेच शालेय आरोग्य तपासणी, गणवेश याचा आढावा घेण्यात आला. सभेला सभापती सुरेश धनके, समिती सदस्या लीलाबाई सोनवणे, समाधान पाटील, हेमांगिनी तराळ, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, अशोक गायकवाड, खलिल शेख, संदीप पाटील आदी उपस्थित होते. सभेत शालेय पोषण आहाराबाबत पूरक आहाराचे मानधन कोशागार कार्यालयात जमा असून, शनिवारपर्यंत मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात आले. तसेच सन 2015-16 व 2016-17 च्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मार्चअखेर सर्व बांधकामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मृदूल अहिरराव यांनी सांगितले. अभियानांतर्गत तीन कामे अपूर्ण असून, त्याच्याशी संबंधित अभियंता शिंदे यांना नोटीस बजाविण्यात आल्याचे अहिरराव यांनी सभेत सांगितले. सर्व शिक्षा अभियानाचा निधी जिल्हास्तरावरून तालुक्‍याला वर्ग झाल्यानंतर तो वितरित होत नाही, यामुळे कामास दिरंगाई होत असते. असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा सदस्यांकडून व्यक्‍त करण्यात आली.

Web Title: Primary health centers works after code of conduct