मंडलीक यांना पंतप्रधान पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नाशिक - योगाच्या प्रचार व प्रसारासाठी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा पंतप्रधान पुरस्कार यंदा नाशिक येथील योग विद्याधामचे प्रणेते योगाचार्य विश्‍वास मंडलीक आणि मुंबई येथील "द योग इन्स्टिट्यूट'ला जाहीर झाला आहे. विविध श्रेणींमध्ये प्राप्त झालेल्या 186 नामांकनांमधून श्री. मंडलीक यांची वैयक्तिक गटासाठी निवड झाली आहे. 25 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2016 रोजी चंडीगड येथे दुसऱ्या योग उत्सवात योगाचा प्रचार व प्रसार कार्यासाठी पुरस्कार देण्याची व त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.
Web Title: prime minister award to vishwad mandlik