वीज वितरण विभाग कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध

adivasi.jpg
adivasi.jpg

अंबासन (नाशिक) : जायखेडा (ता.बागलाण) येथील लाईची टेकडी या आदिवासी वस्तीवर वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक दिवसांपासून परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज वितरण विभागाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त आदिवासी बांधवांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून वीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त केला.  

वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहक वैतागले असून लाईची टेकडी येथे दीडशे ते दोनशे आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरू आहे. गटग्रामपंचायत असलेल्या जायखेडा ग्रामपंचायतीने स्वतंत्र ट्रान्सफार्मरसाठी अनेक वेळा निवेदने दिली. मात्र निगरगट्टा आधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे दिरंगाई होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. ग्रामपंचायतीने १ जानेवारी २०१८ ला कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांना लाईच्या वस्तीवर स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी पत्रव्यवहारही केले होते. परंतू आजतागायत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले जाते. वस्तीला स्वतंत्र ट्रान्सफार्मर नसल्याने लाडूद शिवारातील रस्त्यालगतच्या कमकुवत डिपीवर परिसरातील शेतक-यांचे विहिरीतील विद्युत पंप व वस्तीला स्ट्रिट लाईट जोडणी केली आहे.

ट्रान्सफार्मरच्या क्षेमतेपेक्षा जास्त भार या डिपीवर येत असल्याने वारंवार जळत आहे. त्यामुळे सदर वस्तीवर महीने अन् महीने अंधारात काढावे लागतं आहे. या परिसरातील जंगली श्वापदांचा मोठा वावर असल्याने वस्तीवर सहाच्या आत स्मशान शांतता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता नितिन सुर्यवंशी यांनाही निवेदन दिले असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी एका महिन्यात नवीन ट्रान्सफार्मर बसून देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासन कधीच हवेत विरल्याचे संतप्त ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अखेरीस संतप्त झालेल्या दीडशेवर आदिवासी बांधब व महिलांनी जायखेडा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले मात्र कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांची भेट झाली नसल्याने त्यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यावेळी प्रकाश शेवाळे, दोधा गांगुर्डे, वसंत माळी, फुलसिंग पवार, दोधू सोनवणे, शंकर सोनवणे, बाळू गायकवाड, अनिल गायकवाड, नितीन सोनवणे आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com