राईनपाडा घटनेचा राहुरी येथे निषेध 

विलास कुलकर्णी
मंगळवार, 10 जुलै 2018

राहुरी फॅक्‍टरी : राईनपाडा (धुळे) येथील घटनेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी दशनाम गोसावी समाजातर्फे करण्यात आली. गोसावी समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल दौंडे व पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना निवेदन दिले. 

सोशल मीडियावरील अफवांमुळे राईनपाडा येथे डवरी गोसावी समाजाच्या पाच निरपराध्यांचा बळी गेला. याबाबत "सीआयडी' चौकशी व्हावी, अफवा पसरविणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. भटक्‍या जाती-जमातीला संरक्षण मिळावे. रेणके कमिशनची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. दिलीप गोसावी, कैलास गोसावी, रवींद्र गोसावी, किशोर गोसावी, शंकर गोसावी, विकास गोसावी, धनंजय गिरी, मनोज गोसावी, सचिन गोसावी आदी या वेळी उपस्थित होते.  

Web Title: Protest of the incident in the RainPada incident