संकलित 15 कोटी करातून जनतेच्या हिताची कामे करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

धुळे - चलनातून रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत महापालिकेने शहरातील करदात्यांकडून तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. या निधीतून काही रक्कम महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील तरतुदींसाठी बाजूला काढून उर्वरित रकमेतून जनतेच्या हिताची कामे करावीत, अशी मागणी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने केली आहे.

या संदर्भात आज कॉंग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर कल्पना महाले यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे, की आयुक्त संगीता धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहरातील जनेतकडून जुन्या नोटा स्वीकारत मोठा महसूल जमा केला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, संकलित रकमेमुळे अनेकांचे डोळे विस्फारले गेले आहेत. यातील जास्तीत जास्त रक्कम आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध घटक सरसावले आहेत. तसे न होता जनतेच्या पैशांचा विनियोग जनतेच्या हितासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे.

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य, महसूल व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व अडचणी सोडवाव्यात. उर्वरित रकमेतून शहर विकासाची कामे मार्गी लावावीत. त्यासाठीचा प्राधान्यक्रमही ठरवावा, अशी मागणी प्रभा परदेशी, रूपा त्रिवेदी, प्रीती चौधरी, सरला डामरे, सुनंदा पाटील, रंजना पाटील, शोभा ठाकूर, उषा जगदेव, चंद्रकला खैरनार, मालती बोळे, रेखा सोनवणे, कल्पना पाटील यांनी केली आहे.

Web Title: public welfare activities to collect 15 million tax