त्र्यंबकच्या पुरोहितांमध्ये ओव्यांऐवजी शिव्या

त्र्यंबकच्या पुरोहितांमध्ये ओव्यांऐवजी शिव्या

त्र्यंबकेश्‍वर - येथे पूर्वापार रहिवासी असलेले आणि काही वर्षांपासून बाहेरून आलेले पुरोहित यांच्यात भाविकांच्या पूजाविधीवरून वाद आहेत. या वादावरूनच पुरोहितांमध्ये रविवारी (ता. १७) बेदम हाणामारी झाली. पुरोहितांनी एकमेकांना शिव्याची लाखोली वाहिली. ही घटना मंदिराच्या पश्‍चिम दरवाजा गावकरी गेटमध्ये घडली. 

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या पश्‍चिम दरवाजा गावकरी गेटमधून रोज दुपारी बारापर्यंत पुरोहित आपल्यासोबत पूजा-अर्चा करण्यासाठी भाविकांना मंदिरात घेऊन जातात. त्याची नोंदही ठेवली जाते.

दरम्यान, भाविकांना घेऊन जाण्यावरून संकेत व पराग चांदवडकर बंधू व विनय अस्तेगावकर या पुरोहितांमध्ये वाद झाला. यात शिवराळ मंत्रोच्चार करण्यात येऊन विनय यांना मारहाणही करण्यात आली. काही पुरोहितांनी मध्यस्थी करून चांदवडकर बंधूंना आवर घातला. त्यानंतर काही वेळात पोलिसही तेथे पोचले. मात्र, या पुरोहितांनी आपला वाद गैरसमजातून झाला असल्याचे सांगत तो मिटविला. मात्र, सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हा वाद थेट माध्यमांपर्यंत पोचला. येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टने मात्र याबाबत आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, हा वाद भाविकांना नेण्यावरून न होता अस्तेगावकर यांनी चांदवडकर यांना घरात घुसून अपशब्द वापरल्याने हा वाद झाल्याचे पुरोहित व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com