Dhule News : पुणे एक्स्प्रेस महिन्याच्या आत सुरत-भुसावळ मार्गावर धावणार

शिंदखेडा रेल्वेस्थानकावरील समस्यांची रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
Railway officials during inspection regarding drinking water system. In the last picture, Dada Marathe, Roshan Tatia, giving a statement to Railway Officer Miraj Verma about starting fast trains.
Railway officials during inspection regarding drinking water system. In the last picture, Dada Marathe, Roshan Tatia, giving a statement to Railway Officer Miraj Verma about starting fast trains. esakal

Dhule News : शिंदखेडा रेल्वेस्थानकाववील विविध समस्या तत्काळ सोडवून रेल्वे प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागीय रेल्वे अधिकारी मिरज शर्मा यांनी शिंदखेडा रेल्वेस्थानकाची पाहणी केली त्या वेळी शिंदखेडा रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच नवीन पुणे गाडीसह इतर जलद रेल्वेगाड्या सुरू करण्याचे आश्वासन दिले. (Pune Express will run on Surat Bhusaval route within a month Dhule News)

शिंदखेडा रेल्वेस्थानकाच्या समस्यांबाबतीत ‘शिंदखेडा रेल्वेस्थानकावर सुविधांची वानवा’ असे वृत्त ‘सकाळ’मध्ये झाले होते. बुधवारी (ता. ३) विभागीय रेल्वे अधिकारी वर्मा यांनी शिंदखेडा रेल्वेस्थानकाला भेट देऊन स्टेशनची पाहणी केली.

शिंदखेडा रेल्वेस्थानकावरील शौचालय, प्रवाशांसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती रूम, लाइटची व्यवस्था, कोच पोझिशन आदींची पाहणी केली. श्री. वर्मा यांनी या सर्व समस्या दूर करून तत्काळ प्रवाशांना सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिंदखेडा रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापकांना दिल्या.

पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, येत्या एक महिन्यात गाडी भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर धावेल, असे ठोस आश्वासन श्री. वर्मा यांनी दिले. ते येथे रेल्वेस्थानकाच्या पाहणीसाठी आले असता रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दादा मराठे यांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील आश्वासन दिले.

भुसावळ येथून शिंदखेडा-नंदुरबार-भेस्तानमार्गे पुणे गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांची होती‌. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गावर पुणे गाडी सुरू करण्याच्या सूचनादेखील रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या व या मार्गावर गाडी सुरू होईल, असे आश्वासन प्रवाशांना दिले होते.

Railway officials during inspection regarding drinking water system. In the last picture, Dada Marathe, Roshan Tatia, giving a statement to Railway Officer Miraj Verma about starting fast trains.
Railway News : कोल्हापूर-पुणे मार्गावरील 11 रेल्वे फाटक बंद; रुकडीतील फाटकाचाही समावेश, काय आहे कारण?

पुणे गाडी सुरू करण्यासंदर्भात तालुकाध्यक्ष मराठे यांनी श्री. वर्मा यांना स्मरण करून दिले. त्या वेळी वर्मा यांनी महिन्याच्या आत या मार्गावरून ही गाडी धावेल, असे आश्वासन दिले.

भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर धावणारी अमरावती एक्स्प्रेस नियमित करावी, भुसावळ-नंदुरबार ही गाडी सुरतपर्यंत पुन्हा पूर्ववत करावी, भुसावळ-नंदुरबार गाडी सुरतपर्यंत पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन श्री. वर्मा यांनी दिले. या वेळी पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस, भागलपूर-सुरत एक्स्प्रेस, बरोली-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, इन्सार एक्स्प्रेस.

बांद्रा-पटणा एक्स्प्रेस, उधना बनारस एक्स्प्रेस या गाड्यांना शिंदखेडा रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा याबाबतचे निवेदन रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष मराठे, रोशन टाटिया, राहुल मराठे यांनी दिले.

Railway officials during inspection regarding drinking water system. In the last picture, Dada Marathe, Roshan Tatia, giving a statement to Railway Officer Miraj Verma about starting fast trains.
Mumbai Central Railway: विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केला २०.४९ कोटींचा दंड, मध्य रेल्वेची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com