फटाक्‍यांच्या ध्वनिप्रदूषणात राज्यात पुणे अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

नाशिक - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यभरात फटाक्‍यांच्या ध्वनिप्रदूषणात पुण्यात सर्वाधिक पातळी गाठली गेली. इतकेच नव्हे, तर निर्धारित केलेल्या नियमाच्या जवळपास दुपटीने ही पातळी नोंदविली गेली. पुण्याखालोखाल कोल्हापूरमध्ये सर्वाधिक, तर सर्वांत कमी ध्वनिप्रदूषणाची नोंद नागपुरात झाली. नाशिकमध्ये यंदा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमालीची घट झाल्याचे दिसून आले.

यंदा महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळातर्फे राज्यातील दिवाळीच्या काळात फटाक्‍यांच्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीनुसार, राज्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाची पातळी पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड आणि कर्वे रोड या परिसरात नोंदविली गेली. लक्ष्मी रोडला 93.3, कोथरूडला 87.1, कर्वे रोडला 91.3 डेसिबल इतकी नोंदली गेली. तर पुण्यातच शिवाजीनगर, येरवडा आणि खडकी या भागांत सर्वांत कमी 72.4 डेसिबलची नोंद झाली आहे.

पुण्यानजीकचे पिंपरी-चिंचवडही यात मागे राहिलेले नसून, पिंपरीमध्ये 86.7 डेसिबलची नोंद झाली. पुण्याच्या खालोखाल कोल्हापुरात ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली असून, बिंदू चौकात 88.2 डेसिबल इतकी पातळी नोंदविली गेली.

राज्यात सर्वांत कमी ध्वनिप्रदूषणाची नोंद नागपुरातील धर्मपेठ व जिल्हा रुग्णालय परिसरात झाली. धर्मपेठ परिसरात 62.7, तर जिल्हा रुग्णालय परिसरात 62.8 डेसिबलची नोंद झाली. प्रदूषण मंडळाच्या निर्धारित नियमानुसार दिवसा 55 आणि रात्री 50 डेसिबल ध्वनिप्रदूषण व्हावे, असे अपेक्षित आहे.

वायू प्रदूषणाकडे डोळेझाक
महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने दिवाळीनिमित्त ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली; परंतु त्याच वेळी या फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या विषारी वायूमुळे हवेतही प्रदूषण निर्माण होते. त्याची नोंद मात्र घेतलेली नाही. एकाअर्थी याकडे डोळेझाक केल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. तसेच, दिवाळीपूर्वी मंडळाकडून फटाक्‍यांच्या ध्वनिप्रदूषणाची चाचणी घेतली जाते. परंतु पुणे, कोल्हापूरसह अन्य शहरांमध्ये निर्धारित ध्वनीपेक्षा प्रदूषणाची नोंद झाल्याने फटाक्‍यांची करण्यात आलेली चाचणी कागदोपत्री देखावा होता की काय, अशी शंका उपस्थित झाली.

Web Title: Pune topper is fireworks sound polution in the state