VidhanSabha 2019 : आधी भाजप प्रवेश; नंतर ढिकलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला आहे . राहुल ढिकले यांनी आज (ता.४) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर राहुल ढिकलेंनी नाशिक पूर्वमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐन निवडणुकीत प्रदेश उपाध्यक्षाने पक्ष सोडल्याने नाशिकमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली असून नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला आहे . राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र असून त्यांनी आज (ता.४) भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल ढिकले भाजप कार्यलयात उपस्थित असताना महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते देखील उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर राहुल ढिकले हे नाशिक पूर्वमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ढिकलेंना  पाठिंबा दर्शविण्यासाठी समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. ऐन निवडणुकीत प्रदेश उपाध्यक्षाने पक्ष सोडल्याने नाशिकमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Dhikale's nomination form filed from Nashik East