Loksabha 2019 : राहुल गांधी यांची शुक्रवारी सिन्नरला सभा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नाशिक -  कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 26 एप्रिलला सायंकाळी पाचला सिन्नर येथे सभा होत आहे. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले यांच्यासह शिर्डी मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे. 

सिन्नरशी गांधी घराण्याचा स्नेहभाव राहिला आहे. राजीव गांधी यांनी त्या वेळी नियोजित दौऱ्याला फाटा देत सिन्नरकरांची भेट घेतली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेला त्यादृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. 

आदिवासीबहुल नंदुरबारशी विशेषतः इंदिरा गांधी यांचा स्नेहभाव राहिला आहे. यामुळे त्यांची नात व कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभेची मागणी नंदुरबारमधून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, त्या उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांची सभा होईल का, याबद्दल साशंकता आहे. 

Web Title: Rahul Gandhi Meeting Sinnar