वाघर्डे व मलगावला दारू अड्ड्यांवर छापे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मंदाणे - वाघर्डे व मलगाव (ता. शहादा) येथे गावठी हातभट्टीची दारू अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकून शकडो लिटर दारू तयार करण्याचे रसायनयुक्तr माल नष्ट केला. सुमारे 60 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वाघर्डे व मलगाव या गावानजीक गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती खुलेआम विकली जाते असा सुगावा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाला. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी लतीफ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्ररीत्या पोलिस पथके तयार करुन सापळा रचण्यात आला. 

आज सकाळी सातच्या सुमारास हवालदार धनराज जाधव, बलविंद्र ईशी, अरुण चव्हाण, करणसिंग वळवी यांच्या पथकाने वाघर्डे गावात छापा टाकला. त्यावेळी तुकाराम दामजी पावरा त्यांच्या घरामागे गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आढळून आले. दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन ड्रममध्ये साठवून ठेवलेला शेकडो लिटर माल जागेवर नष्ट करण्यात आला. त्यानंतर तेथील साहित्य तीन निळ्या रंगाचे प्लॅस्टिकच्या 200 लिटरचे ड्रम तसेच 50 लिटर क्षमतेचे आठ ड्रम, दोन नळ्या, दोन मोठे पातेले असा 15 हजार रुपयांचा 

मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पोलिस हवालदार अरुण चव्हाण यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तुकाराम पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. 

मलगाव येथे छापा 
मलगाव येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे यांचे नेतृत्वाखाली हवालदार मनोज सरदार, दासू वसावे, जलाल शेख, विकास कापुरे यांच्या पथकाने मलगाव गावाजवळील म्हैस नदीच्या काठावर गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर टाकला. त्यावेळी दारू बनविण्यासाठी महू व रसायनाचा साठा आढळला. शेकडो लिटरचा हा साठा जागेवरच पोलिसांनी नष्ट केला. दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य 40 लिटर क्षमतेचे 19 ड्रम, तीन नळ्या, तीन पातेली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी हवालदार विकास कापुरे यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली आहे. 

दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ 
पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी महिनाभरापासून मंदाणे परिसरात ठिकठिकाणी गावठी हातभट्टीच्या दारूनिर्मिती करण्याऱ्या अड्ड्यांवर सहकाऱ्यांसह धाडी टाकण्याचे सत्र सुरू केल्याने दारू बनवून विकणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मानमोडे येथील दारूअड्डे उदध्वस्त केल्यानंतर पुन्हा अचानक आज मलगाव व वाघर्डे येथे धाडी टाकण्यात आल्याने अवैध दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

Web Title: raid on liquor in shahada