तुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात किती बदल केले आणि ते नियमात आहेत काय, याची जंत्री जाणून घेत मुंढे यांच्या दाव्याला शह देण्याचा हा प्रयत्न आहे. 

नगररचना विभागाच्या अभियंत्यांकडून गेल्या वर्षभरातील बदलांची माहिती मागविण्यात आली आहे. आयुक्तपदावरून मुंढे यांची उचलबांगडी केल्यानंतरही लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. मुंढे यांची बदली होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयांची उलट तपासणी सत्ताधारी भाजपकडून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेदरम्यान शहरात 2 लाख 80 हजार मिळकती अनधिकृत असल्याचा अजब दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. महासभेतदेखील तत्कालीन आयुक्त मुंढे यांना नगरसेवकांनी जाब विचारला होता. या वेळी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विभागीय कार्यालये यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे का? विभागीय महसूल आयुक्त कार्यालय तसेच अन्य सरकारी कार्यालयांबाबत नगरसेवकांनी माहिती विचारली होती. माहिती घेऊन सांगता येईल, असे उत्तर देत नगररचनाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. याच दरम्यान मुंढे यांची बदली झाली. पण शहरातील 60 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांच्या मनात धडकी भरविणारा हा निर्णय जिव्हारी लागल्याने मुंढे यांच्या बदलीनंतरदेखील त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. 

Web Title: Raid on tukaram mundhe house in nashik