रुळामध्ये अडकला पाय; तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

जळगाव ः पाहुण्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे जात असताना तरुणाचा रुळामध्ये पाय अडकला, त्याच क्षणी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली येऊन त्याचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 9) सायंकाळी नशिराबाद रेल्वेफाटकाजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव ः पाहुण्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे जात असताना तरुणाचा रुळामध्ये पाय अडकला, त्याच क्षणी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली येऊन त्याचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 9) सायंकाळी नशिराबाद रेल्वेफाटकाजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
मृताच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय श्‍यामसुंदर मोरे (वय 23) हा नशिराबाद येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. तो एका दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे लग्न ठरले असून, आज (ता. 8) बस्त्याचा कार्यक्रम होता. तत्पूर्वी गुरुवारी (ता. 7) सायंकाळी अक्षय हा बस्त्यासाठी आलेल्या पाहुण्यांना घेण्यासाठी भादली रेल्वेस्थानकावर दुचाकीने जात होता. तत्पूर्वी त्याने नशिराबाद रेल्वेफाटकाजवळ दुचाकी लावली केली आणि स्थानकाकडे पायी जात असताना त्याचा रेल्वे रुळामध्ये पाय अडकला. त्याचवेळी जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या नवजीवन एक्‍स्प्रेसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वे कर्मचारी सचिन माळी यांच्या लक्षात येताच त्यांनी नशिराबाद येथील तरुणांना माहिती कळविली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

अक्षयचा होता लग्नाच्या बस्ता, अन... 
अक्षयचा आज लग्नाचा बस्ता होता. त्यासाठी पाहुण्यांना घेण्यासाठी तो जात असताना रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. आज सकाळी जिल्हा रुग्णालयात अक्षयचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाइकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. त्याच्या पश्‍चात आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway line boy death nashirabd jalgaon