रुळाला तडे गेल्याने ‘राज्यराणी’चा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 24 जुलै 2019

मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकावर आज सकाळी रेल्वे रुळाला अचानक तडा गेला. या वेळी मनमाडहून मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्‍स्प्रेस तीन क्रमांकाच्या फलाटावर आलेली होती. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याचदरम्यान मुंबईकडे जाणारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्‍स्प्रेस व अन्य गाड्या फलाट क्रमांक चारवरून वळविण्यात आल्या.

इगतपुरी - मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकावर आज सकाळी रेल्वे रुळाला अचानक तडा गेला. या वेळी मनमाडहून मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्‍स्प्रेस तीन क्रमांकाच्या फलाटावर आलेली होती. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याचदरम्यान मुंबईकडे जाणारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्‍स्प्रेस व अन्य गाड्या फलाट क्रमांक चारवरून वळविण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, फलाट क्रमांक तीनवर अडकलेल्या राज्यराणी एक्‍स्प्रेसचा खोळंबा झाला. आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन रुळाला तात्पुरता जोड देत राज्यराणी एक्‍स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. तोपर्यंत राज्यराणी एक्‍स्प्रेसला अर्धा ते पाऊण तास उशीर झाला. तडा गेलेल्या रुळाची तातडीने दुरुस्ती करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railwayline Crack Rajyarani Express