इगतपुरीत चौफेर बरसात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

इगतपुरी तालुक्‍यात सलग तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्‍यात चौफेर जोरदार पाऊस बरसत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. गुरुवारपासून इगतपुरी तालुक्‍यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

इगतपुरी - इगतपुरी तालुक्‍यात सलग तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्‍यात चौफेर जोरदार पाऊस बरसत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. गुरुवारपासून इगतपुरी तालुक्‍यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसल्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता; परंतु आता 48 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या संततधारेने खरिपाच्या कामांना वेग येणार आहे. या वर्षी खरीप हंगामासाठी सुमारे 32 हजार 700 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीसाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 27 हजार 200 हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Agriculture Water