बागलाणच्या पश्चिमपाट्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार सलामी

रोशन भामरे
रविवार, 3 जून 2018

सटाणा-तळवाडे रस्त्यात झाडे पडल्यामुळे ८ ते १० गावांचा संपर्क तुटला
सटाणा तळवाडा रस्त्यावर्ती डोंगरेज ते वटार दरम्यान तीन-चार ठिकाणी झाडे पडल्यामुळे  ८ ते १० गावांचा संपर्क तुटला असून, सटाणा तळवाडा बस सेवा ही पाठवा रस्त्याने वळविण्यात आली होती. डोंगरेज,वटार,विंचूरे,किकवारी गावातील प्रवाशांना पायपीट करावी लागली तसेच त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला आहे.

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्याच्या पश्चिमपट्यातील मुंजवाड, खमताणे, चौधाने, कंधाने, निकवेल, जोरण, वटार, विंचूरे, किकवारी, तळवाडे दिगर, डांगसौंदाणे, मोरकुरे, भवाडे आदी गावांमध्ये काल शनिवारी (ता.२) दुपारी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाट -वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी लावली.

सोसायट्याच्या वा-यामुळे पाचटच्या चाळींनवर पावसाच्या बचावासाठी टाकलेले प्लास्टिक कागदाच्या आच्छादन ऊडाल्याने ब-याच शेतकरी वर्गाचा कांदा पावसात भिजल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (कंधाने)येथील पठावा रोडलगत विद्युत वाहिनीचे पोल मोडून विद्युत तार रस्त्यावर पसरले होते सुदैवाने लाईट गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हया पडलेल्या विद्युत खांबाच्या परिसरात ब-याच शेतक-यांची घरे व बैलगोठे आहेत हया वादळात दोन सिंमेटच्या पोलांचे नुकसान झाले आहे. ब-याच  शिवारपांदीच्या ठिकाणी मोठ मोठाली वृक्ष कोलमडुन पडल्याने शेतक-यांची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

खरिपाच्या मशागतीत व्यस्त असलेल्या बळीराज्याल्या बळीराज्याला पावसाचा अंदाज आला नाही . दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टमाटे, कोबी रोपे,मिरची अश्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने परिसरात भाजीपाला पिकांचेही आतोनात नुकसान झाले आहे. बहरलेले टमाट्यांचे पूर्ण फूल गळाले आहे.वालपापडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच आंब्यांच्या झाडे मोडून पडले असून फळ आलेल्या झाडे मोडल्याने आंब्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असून बळीराज्याचे तूर्त कंबरच मोडलं असून खरिपाचे अर्थकारण कोलंडल्याचे चित्र दिसत आहे.वटार येथील प्रगतिशील शेतकरी सुनील रामदास खैरनार यांच्या शिमला मिरचीचा एक एकरचा प्लॉटचा शेडनेट तुटल्याने लाखोंचे नुकसान झाले असून बहार आलेली शिमला मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसापासुन परिसरात उन्हाच्या वाढत्या प्रकोपाने नागरिक हैरान झाले होते पण हया दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

सटाणा-तळवाडे रस्त्यात झाडे पडल्यामुळे ८ ते १० गावांचा संपर्क तुटला
सटाणा तळवाडा रस्त्यावर्ती डोंगरेज ते वटार दरम्यान तीन-चार ठिकाणी झाडे पडल्यामुळे  ८ ते १० गावांचा संपर्क तुटला असून, सटाणा तळवाडा बस सेवा ही पाठवा रस्त्याने वळविण्यात आली होती. डोंगरेज,वटार,विंचूरे,किकवारी गावातील प्रवाशांना पायपीट करावी लागली तसेच त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला आहे.

Web Title: rain in Nashik

टॅग्स